Indian Navy Destroyer Missile Test INS Surat: पहलगाममध्ये पाकपुरस्कृत दहशतवाद्यांनी २६ भारतीय निष्पाप हिंदू नागरिकांची हत्या केली. या हल्ल्यानंतर भारताकडून कठोर पावले उचलण्यात आली. सिंधू पाणी करार रद्द करण्यात आला. तसेच ४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारतातून बाहेर होण्यास सांगण्यात आले. कायदेशीर व राजकीय स्तरावर पाकिस्तानची कोंडी ( Pakistan ) केल्यानंतर, आता लष्करी पातळीवरही तयारी सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून भारतीय नौदलाने एक मोठी कामगिरी केली आहे.
भारतीय नौदलाची ताकद वाढणार
भारतीय नौदलाच्या स्वदेशी बनावटीच्या युद्धनौके INS सुरतने समुद्रात वेगाने उडणाऱ्या आणि लक्ष्यावर अचूक हल्ला करणाऱ्या Destroyer क्षेपणास्त्राचे यशस्वी परीक्षण केले आहे. या कामगिरीमुळे नौदलाची ताकद आणखी बळकट झाली आहे. हे यश स्वदेशी युद्धनौकेची रचना, विकास आणि ऑपरेशन्समध्ये भारतीय नौदलाची वाढलेली ताकद दर्शवते. यामुळे संरक्षण क्षेत्रात स्वावलंबी भारताचे स्वप्न आणखी सामर्थ्यशाली होत आहे.
अरबी समुद्रात केलेली चाचणी महत्त्वाची का?
अरबी समुद्रात Destroyer मिसाइची झालेली यशस्वी चाचणी खूप महत्त्वाची आहे. कारण पाकिस्तान देखील त्याच भागात क्षेपणास्त्राची चाचणी घेणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने घेतलेल्या जलद निर्णयांमुळे पाकिस्तान बिथरला आहे. तशातच पाकिस्तान क्षेपणास्त्र चाचणी करणार असून या संदर्भात त्यांनी एक अधिसूचनाही जारी केली आहे.
पाकिस्तान मिसाईल चाचणीच्या तयारीत
पाकिस्तानने अरबी समुद्राच्या क्षेत्रात क्षेपणास्त्राची चाचणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. हे क्षेपणास्त्र जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र असेल आणि त्याची चाचणी २४-२५ एप्रिल रोजी कराची किनाऱ्यावर केली जाईल. भारतातील तपास संस्था या घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत. याबाबत, गृह मंत्रालयातील गृह सचिवांसोबत रॉ आणि आयबी प्रमुखांची उच्चस्तरीय बैठक झाली आहे.