शहरं
Join us  
Trending Stories
1
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
2
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
3
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
4
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
5
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
6
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
7
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
8
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
9
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
10
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
11
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
12
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
13
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
14
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
15
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
16
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
17
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
18
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
19
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
20
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
Daily Top 2Weekly Top 5

हाथरस प्रकरणामुळे दुखावलेल्या वाल्मिकी समाजाच्या ५० कुटुंबांनी स्वीकारला बौद्ध धर्म

By कुणाल गवाणकर | Updated: October 22, 2020 14:55 IST

hathras case: सातत्यानं दुर्लक्ष केलं जात असल्यानं वाल्मिकी समाजातल्या कुटुंबाचा निर्णय

गाझियाबाद: संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणाची सुनावणी सध्या सुरू आहे. या घटनेचे तीव्र सामाजिक पडसाद उत्तर प्रदेशात पाहायला मिळत आहेत. गाझियाबादमधल्या करहेडामधल्या वाल्मिकी समाजातल्या ५० कुटुंबांनी धर्मांतर केलं आहे. एकूण २३६ जणांनी बौद्ध धर्म स्वीकारला आहे. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकरांच्या उपस्थितीत त्यांनी बौद्ध धर्माची दिक्षा घेतली.हाथरस प्रकरणामुळे अतिशय दु:ख झाल्याची भावना बौद्ध धर्म स्वीकारणाऱ्या वाल्किमी कुटुंबांनी व्यक्त केली. 'आमच्याकडे सातत्यानं दुर्लक्ष केलं जात आहे. आर्थिक विवंचनेचा सामना करत असूनही प्रकरणांची सुनावणी घेतली जात नाही,' अशी व्यथा बौद्ध धर्माचा स्वीकार करणाऱ्या कुटुंबीयांनी मांडली. या कुटुंबांना भारतीय बौद्ध महासभेकडून एक प्रमाणपत्र देण्यात आलं.आमच्या गावातल्या ५० कुटुंबांमधल्या २३६ जणांनी बौद्ध धर्माची दिक्षा घेतल्याचं बीर सिंह यांनी सांगितलं. 'बौद्ध धर्म स्वीकारण्यांमध्ये महिला आणि बालकांचाही समावेश आहे. त्यांनी यासाठी कोणतंही शुल्क घेतलेलं नाही. बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर समाजसेवा करा, असं त्यांनी सांगितलं,' अशी माहिती सिंह यांनी दिली.१४ सप्टेंबरला हाथरसमधील बुलगढी गावातल्या वाल्मिकी समाजाच्या एका मुलीवर सामूहिक बलात्कार झाला. या मुलीची जीभही कापून टाकण्यात आली. रुग्णालयात कित्येक दिवस पीडितेवर उपचार सुरू होते. मात्र तिची झुंज अपयशी ठरली. यानंतर वाल्मिकी समाजात आक्रोश पाहायला मिळाला. सध्या सीबीआयकडून प्रकरणाची चौकशी सुरू आहे. चारही आरोपी अलिगढमधील तुरुंगात आहेत. 

टॅग्स :Hathras Gangrapeहाथरस सामूहिक बलात्कार