श्रीनगर- नियंत्रण रेषेवर भारताकडून नागरीकांना निशाणा बनविला गेल्यानंतर भारताची चौकी उडविली आहे. यामध्ये पाच भारतीय जवान मारले गेले असल्याचा दावा गुरूवारी पाकिस्तानी सैन्याने केला आहे. व्हिडीओ जारी करून पाकिस्तानी सैन्याने हा दावा केला आहे. पाकिस्ताने सेनेच्या इंटर सर्व्हिस रिलेशनचे महानिर्देशक मेजर जनरल आसिफ गफूर यांनी भारतीय चौकीवर हल्ला केल्याचा एक व्हिडीओ ट्विट केला आहे. नियंत्रण रेषेवर टाट्टा पाणी (हॉट स्प्रिंग) सेक्टरमध्ये सामान्य नागरीकांना निशाणा बनविणारी भारतीये सेनेची चौकी पाकिस्तानी सैनिकांनी उडविली आहे. यामध्ये पाच भारतीय सैनिक मारले गेले तर अनेक जण जखमी झाले आहेत, असं त्यांनी ट्विटमध्ये म्हंटलं आहे.
गफूर यांच्याद्वारे ट्विट केल्या गेलेल्या 57 सेकंदाच्या व्हिडीओमध्ये जंगलातून धूर निघताना दिसतो आहे. पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनच्या वृत्तानुसार, स्थानिक पाकिस्तानी अधिकाऱ्यांकडून सांगितलं जातं आहे की,पीओकेमध्ये सीमेला लागून असणाऱ्या अतिसंवेदनशील गावात भारतीय जवानांकडून एक स्कूल व्हॅनवर हल्ला करत बसच्या ड्रायव्हरला मारण्यात आलं. या घटनेच्या काही तासाने भारतीय चौकी उडविण्याचा निर्णय घेण्यात आला.
हल्ला झालेल्या स्कूल बसमध्ये चार विद्यार्थी होते. गाडी मुलांना घेऊन मंढोलमधून धरमसाल येथे जात होती. त्यावेळी जवळपास दिड वाजता भारतीय सैनिकांनी गाडीवर हल्ला केला. हत्या झालेल्या गाडीच्या ड्रायव्हरची ओळख मोहम्मद सरफराज अशी पटली आहे, असं हजीरा सिंकदरचे असिस्टंट कमिश्नर हयात यांनी म्हंटलं.