जम्मू : सीमेवर राहणाऱ्या नागरिकांत अशांतता आणि संभ्रम निर्माण करण्यासाठीच पाकिस्तान कबुतरे पाठवीत असल्याचा दावा सैन्याच्या एका अधिकाऱ्याने केला आहे. याशिवाय बलूनच्या माध्यमातूनही धमक्यांचे संदेश देण्यात येत आहेत. पाकिस्तानची ही मनोवैज्ञानिक मोहीम असल्याचे सांगितले जात आहे. भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मिरात केलेल्या हल्ल्यानंतर असे प्रकार पाकिस्तानकडून सुरू आहेत. सीमेवरील एका अधिकाऱ्याने सांगितले की, जम्मूच्या अरनिया भागात तर दिनानगरच्या घेसाल गावात आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर पठाणकोटच्या बमियाल भागात सिमबल चौकीवर आॅक्टोबरमध्ये असे संदेश कबुतर आणि बलूनच्या माध्यमातून पाठविले जात आहेत. बीएसएफच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, सीमावर्ती भागातील नागरिकांचे मनोधैर्य खच्चीकरणाचा आणि सुरक्षा दलाला संभ्रमित करण्याचा प्रयत्न पाककडून होत आहे. भारताची यावर काय प्रतिक्रिया येते तेही जाणून घेण्याचा हेतू यामागे असतो. ट्रवेरा या गावात दोन दिवसांपूर्वी सुनील यांच्या शेतात पाकिस्तानचा एक बलून येऊन पडला. यातही संदेश होता. (वृत्तसंस्था)
सीमेवर संभ्रमासाठीच पाकचे फुगे आणि कबुतरे
By admin | Published: October 06, 2016 5:34 AM