शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
3
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
4
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
5
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
6
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
8
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
9
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
10
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
11
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
12
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
13
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
14
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
15
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
16
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
17
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
18
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
19
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...

पाकच्या कुरापती कायम; दोन जवानांना वीरमरण

By admin | Published: July 13, 2017 5:57 AM

हिजबुल मुजाहिद्दिनच्या तीन अतिरेक्यांचा खात्मा केल्यानंतर पाकिस्तानने बुधवारी दुपारी पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले.

श्रीनगर : अमरनाथ यात्रेकरूंवरील हल्ल्यानंतर काश्मीरमधील सुरक्षा प्रचंड प्रमाणात वाढवल्यानंतर आणि हिजबुल मुजाहिद्दिनच्या तीन अतिरेक्यांचा खात्मा केल्यानंतर पाकिस्तानने बुधवारी दुपारी पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. पाकिस्तानने केलेल्या बेछूट गोळीबारात भारताच्या दोन जवानांना वीरमरण प्राप्त झाले.कुपवाडा जिल्ह्याच्या केरन क्षेत्रात पाकिस्तानी लष्कराने जोरदार गोळीबार व तोफांचा मारा केला. यात भारताचे दोन जवान हुतात्मा झाले असल्याची माहिती लष्कराने दिली असली तरी त्या दोघांची नावे मात्र जाहीर करण्यास नकार दिला आहे. भारतीय जवानांचे गस्ती पथक व पाकिस्तानी लष्कर यांच्यात चकमक होऊ न, हे जवान शहीद झाल्याचे आधी सांगण्यात येत होते. केरन क्षेत्रातील फुरकिया गली भागात हा गोळीबार झाला. तो पाकिस्तानी लष्कराने केला की पाकच्या बॉर्डर अ‍ॅक्शन टीमने (बॅट) केला, हे स्पष्ट झालेले नाही. मात्र फुरकिया गली भागातून पाकिस्तानी दहशतवादी नेहमी घुसण्याचा प्रयत्न करीत असतात आणि त्या वेळी बॅटतर्फे गोळीबार केला जातो. आजही तसे घडले का, हे सांगण्यात आलेले नाही. (वृत्तसंस्था)>आझादीच्या घोषणाहा प्रकार घडण्याच्या काही तास आधीच भारतीय सुरक्षा दलांनी बडगाम जिल्ह्यात तीन दहशतवाद्यांचा खातमा केला होता. त्यातील एका दहशतवाद्याच्या अंत्ययात्रेच्या वेळी जमलेल्या हजारो लोकांनी काश्मीरच्या आझादीच्या घोषणा दिल्या आणि सुरक्षा दलाच्या जवानांवर दगडफेकही केली. >राहुल यांचे टीकास्त्र : नवी दिल्ली : देशाची सुरक्षा व्यवस्था धोक्यात आलेली असताना भाजपा एका व्यक्तीच्या प्रतिमा संवर्धनात मग्न आहे. अमरनाथ यात्रेकरूंवर झालेला दहशतवादी हल्ला आत्ममग्नतेचे ढळढळीत उदाहरण आहे, असा हल्ला काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केला. सुरक्षेतील चूक मान्य होणारी नाही. मोदी यांना ही जबाबदारी घ्यावी लागेल व पुन्हा असे घडणार नाही याची व्यवस्था करावी लागेल, असे गांधी म्हणाले.ते म्हणाले की, गुप्तचर यंत्रणांनी केंद्र सरकारला ईदनंतर मोठ्या दहशतवादी हल्ल्याची तयारी सुरू आहे व अमरनाथ यात्रा हे त्यांचे लक्ष्य आहे, असे आधीच सांगितले होते. असे असतानाही सरकारने सुरक्षेची पूर्ण उपाययोजना का केली नाही?मोदी यांच्या वैयक्तिक लाभापायी निष्पाप भारतीयांचे बलिदान सुरू आहे. भाजपाने क्षणिक राजकीय लाभासाठी पीडीपीशी जी युती केली, त्याची मोठीच किंमत देश मोजत आहे.>भाजपाचा प्रतिहल्लाकाश्मीरमधील दहशतवादाची समस्या ही नेहरू-गांधी परिवाराने निर्माण केली आहे, असा प्रतिहल्ला केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांच्यावर चढवला. परदेशातून आल्यानंतर राहुल यांनी दहशतवाद्यांचा नव्हे, तर नरेंद्र मोदी यांचा निषेध केला, यातूनच सारेकाही स्पष्ट झाले आहे, असेही त्यांनी बोलून दाखवले.>काश्मीरमधील अतिरेक्यांना आम्ही संपवत आणले असून, येथील दहशतवाद लवकरच पूर्णपणे संपेल, असा दावा पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री जीतेंद्र सिंग यांनी येथे केला.