शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

भारताच्या हवाई तळावर पाक अतिरेक्यांचा हल्ला

By admin | Published: January 03, 2016 5:09 AM

मैत्रीचा हात पुढे करीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेल्या आकस्मिक लाहोर भेटीला आठवडा उलटण्याच्या आत पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या एका सशस्त्र गटाने शनिवारी पहाटे पठाणकोटमधील

पठाणकोट : मैत्रीचा हात पुढे करीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेल्या आकस्मिक लाहोर भेटीला आठवडा उलटण्याच्या आत पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या एका सशस्त्र गटाने शनिवारी पहाटे पठाणकोटमधील हवाई दलाच्या तळावर हल्ला चढविला. भारत-पाकिस्तान सरहद्दीपासून सर्वांत जवळ असलेल्या या हवाई तळावर हल्लेखोरांना रोखण्यास झालेल्या तब्बल १५ तासांच्या चकमकीत भारतीय जवानांनी प्राणांची बाजी लावली. या भीषण चकमकीत पाचही हल्लेखोरांना कंठस्नान घालताना तीन जवान शहीद झाले. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांच्या थेट देखरेखीखाली दहशतवाद्यांविरुद्ध ही मोहीम राबविण्यात आली. या हल्ल्यामुळे एकाचवेळी पंजाब पोलिसांची ढिलाई व डोवल यांच्या देखरेखीतील गुप्तचरांची तत्परता अधोरेखित झाली. गुरुवारी रात्री पंजाब पोलिसांच्या एका एसपीचे काही सशस्त्र दहशतवाद्यांनी अपहरण केल्यानंतर हल्ल्याच्या संशयाने डोवल यांनी एनएसजी कमांडोंचे एक पथक शुक्रवारी रात्रीच येथे पाठविले होते. याशिवाय लष्कराची एक तुकडीही तळावर तैनात करण्यात आली होती. पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने हा हल्ला केला असण्याची शक्यता आहे. भारत-पाकिस्तान यांच्यातील शांतता व चर्चेच्या प्रक्रियेत खोडा घालण्यासाठी हा हल्ला करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या दहशतवादी हल्ल्याचा कट पाकिस्तानातच रचण्यात आला होता, अशी आपली विश्वसनीय माहिती असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले, तर आम्हाला शांतता हवी असली तरी जसास तसे प्रत्युत्तर मिळेल असा इशारा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला दिला. विशेष म्हणजे पाकिस्तानी परराष्ट्र खात्याने या हल्ल्याचा निषेध केला आहे. या हल्ल्यानंतर पंजाब, दिल्ली, जम्मू-काश्मीर आणि उत्तराखंडसह देशभरात सर्वत्र सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पंजाबमध्ये गेल्या सहा महिन्यात झालेला हा दुसरा दहशतवादी हल्ला आहे. गेल्या वर्षी २७ जुलैला गुरुदासपूरमधील एका पोलीस ठाण्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता.आरडीएक्ससह घुसले दहशतवादीमोठ्या प्रमाणात आरडीएक्ससह या दहशतवाद्यांनी जंगलात असलेल्या हवाईदल तळाच्या मागच्या बाजूने प्रवेश केला. परंतु ते तळाच्या बाह्य भागात असलेल्या ‘लंगर’मधून पुढे सरकू शकले नाहीत. कारण सुरक्षा दलाचे जवान त्यांचा मुकाबला करण्यास सज्ज होते. हल्ल्यानंतर भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल नॅशनल सिक्युरिटी कंट्रोल रूममध्ये बसूनया संपूर्ण घडामोडींवर नजर ठेवून होते.दहशतवाद्यांना शोधण्यासाठी ड्रोनचा वापरहवाईदल तळावर पहाटे ३.३० वाजताच्या सुमारास हा हल्ला झाला. परंतु तळाचे सुरक्षा कवच भेदून दहशतवादी आत प्रवेश करूशकले नाहीत. त्यांना सुरक्षा दलाने बाहेरच रोखून धरले. सुरुवातीस जवळपास पाच तास चाललेल्या या भीषण चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा झाला. त्यानंतर आणखी काही दहशतवादी दडले आहेत का, हे पाहण्यासाठी लागलीच शोधमोहीम राबविण्यात आली. त्यादरम्यान झालेल्या गोळीबार आणि स्फोटांनंतर लष्कराने आॅपरेशन जारी ठेवले. अखेर दडून बसलेल्या पाचव्या दहशतवाद्यालाही सायंकाळी उशिरा कंठस्नान घालण्यात भारतीय जवानांना यश आले. हा दहशतवादी झुडपी भागात दडून ग्रेनेड््सचा हल्ला करीत होता. हा संशयित दहशतवादी ज्या भागात दडून बसला होता त्या संपूर्ण परिसराला वेढा घातल्यावर त्याला शोधण्याकरिता ड्रोनचाही वापर केला गेला.दहशतवाद्यांचा खात्मा करण्याकरिता हवाईदलाने संयुक्त दलाच्या मदतीसाठी एमआय-२५ बनावटीची दोन लढाऊ हेलिकॉप्टर तैनात केली होती. या हल्ल्याने तळाच्या गाभ्याला कुठलाही धक्का बसला नसून येथील हेलिकॉप्टर आणि इतर सामग्री सुरक्षित आहे.हवाईदलाच्या या तळावर मिग-२१ लढाऊ विमाने व एमआय-२५ लढाऊ हेलिकॉप्टरचा ताफा आहे.हा हल्ला भारताची प्रगती न पाहवणाऱ्या ‘मानवतेच्या शत्रूंनी’ रचलेले कारस्थान आहे. देशाच्या शत्रूचे असे कुटिल डाव हाणून पाडण्यास आपली सशस्त्र सेनादले पूर्णपणे समर्थ आहेत.- नरेंद्र मोदी