मुंबई : पाकिस्तानने लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आगळीक केली तेव्हा आम्ही त्याकडे राष्ट्रीय समस्या म्हणून पाहिले. मात्र आता काही मंडळी पराभवामुळे हताश होऊन केंद्र सरकारवर राजकीय आरोप-प्रत्यारोप करीत आहेत. त्यांना उत्तर देशाच्या पंतप्रधानाने नव्हे तर सीमेवरील बंदूकधारी जवानाने चाप ओढून द्यायला हवे, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. मुंबईतील भाजपाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ घाटकोपर येथे झालेल्या सभेत मोदी बोलत होते. ते म्हणाले की, पाककडून सुरू असलेल्या हल्ल्यांचे आम्ही राजकारण केले नाही. सध्या या प्रश्नावरून केंद्र सरकारला अडचणीत आणले जात आहे. सरकार या टीकेला कृतीतून चोख उत्तर दिले जाईल. महाराष्ट्रात लुळेपांगळे सरकार सत्तेवर बसवू नका. कुणाची तरी मदत घेऊन सरकार सत्तेवर बसले तर जनतेचा त्या सरकारवर वरचष्मा राहत नाही. परस्परांवर जबाबदारी ढकलण्याची संधी मिळते, असेही मोदी म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)
पाकला जवानच उत्तर देतील- मोदी
By admin | Published: October 10, 2014 6:05 AM