Navjot Singh Sidhu: "पाकिस्तानी सैन्याचा प्रमुख हा नवज्योत सिंग सिद्धूंचा पंजाबी भाऊ"; रावतांचे वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2021 11:13 AM2021-09-21T11:13:21+5:302021-09-21T11:14:48+5:30
Navjot Singh Sidhu controversy: एकप्रकारे त्यांनी सिद्धू यांची बाजू घेतली आहे. तसेच हे करताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली आहे. पंजाबमध्ये सिद्धू यांचे पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान आणि पाकिस्तानी सैन्य प्रमुख कमर जावेद बाजवा यांच्याशी असलेल्या मैत्रीच्या संबंधांवरून भाजपाने प्रश्न उपस्थित केले आहेत.
पंजाबमध्ये काँग्रेसमधील सत्तासंघर्ष (Punjab Politics) काही थांबण्याचे नाव घेत नाहीय. कॅप्टन अमरिंदर सिंग यांना मुख्यमंत्री पदाची खूर्ची गमवावी लागलेली असताना त्यांनी सोनियांना सिद्धू आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधांवर अवगत केले आहे. याचा पक्षाला मोठा फटका बसू शकतो, असेही त्यांनी सांगितले आहे. परंतू, पंजाबचे प्रभारी हरीश रावत (Harish Rawat) यांची वक्तव्ये सुरुच आहेत. त्यांनी पाकिस्तानी सैन्याचा प्रमुख हा नवज्योत सिंग सिद्धूंचा (Navjot Singh Sidhu) पंजाबी भाऊ असल्याचे वक्तव्य करून खळबळ उडवून दिली आहे. (Pakistan Army chief Qamar Javed Bajwa is Punjabi brother of Navjot Singh Sidhu: Harish Rawat.)
एकप्रकारे त्यांनी सिद्धू यांची बाजू घेतली आहे. तसेच हे करताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली आहे. पंजाबमध्ये सिद्धू यांचे पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान आणि पाकिस्तानी सैन्य प्रमुख कमर जावेद बाजवा यांच्याशी असलेल्या मैत्रीच्या संबंधांवरून भाजपाने प्रश्न उपस्थित केले आहेत. यावर रावत यांनी हे उत्तर देताना मोदी देखील तत्कालीन पाकिस्तानी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या वाढदिवसाला गळाभेट घ्यायला गेले होते, असे म्हटले आहे.
जेव्हा सिद्धू भाजपाचे खासदार होते, तेव्हा त्यांना पंजाबमध्ये तारणहार म्हटले जात होते. आता काँग्रेसमध्ये आल्याने भाजपाच्या नेत्यांना सिद्धू आणि पाकिस्तानची मैत्री डोळ्यात खुपू लागली आहे. तेव्हा देखील सिद्धू यांची इम्रान खानसोबत गाढी मैत्री होती, अशी टीका रावत यांनी केली आहे.
रावत यांनी वेळोवेळी सिद्धूची साथ दिली आहे. यामुळे ते अडचणीतही आले आहेत. रावत यांच्यामुळेच कॅप्टनना पद सोडावे लागले आहे. यामुळे रावत यांना त्यांनी घेतलेला निर्णय बरोबर आहे, हे सिद्ध करावे लागत आहे. तसेच पुढील निवडणूक ही सिद्धू यांच्या चेहऱ्यावरच लढविली जाईल अशी घोषणा रावत यांनी केली होती. मात्र, नंतर हायकमांडने झापल्यावर त्यांना सफाई द्यावी लागली होती.