भारताने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तान आणि तेथील माध्यमं बिथरली असून पाकिस्तान हे फेकिस्तानं बनल की काय ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण, पाकिस्तानी सोशल मीडिया आणि तेथील अधिकृत सरकारी मीडियाकडूनही खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत. पाकिस्तानने बुधवारी सकाळी भारताच्या हद्दीत घुसखोरी केली. त्यावेळी, भारताचे दोन विमान पाडल्याचा खोटा दावा तेथील मीडियाकडून व लष्कराकडून करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, भारतीय वायू सेनेच्या कोसळेल्या जुन्याच विमानांचे फोटो आणि एक व्हिडीओही व्हायरल करण्यात आला आहे.
भारतीय हवाई दलाने नाकावर टिच्चून बालाकोट येथील दहशतवाद्यांचा तळ उद्धस्त केल्याने पाकिस्तानची चांगलीच नाचक्की झाली आहे. भारताच्या या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानी हवाई दलाने आज भारतात घुसून प्रतिहल्ला करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. पण, भारतीय हवाई दलाने हा हल्ला हाणून पाडला. दुसरीकडे पाकिस्तानच्या हद्दीत घुसलेली दोन भारतीय विमाने पाडण्यात आली असून, दोन वैमानिकांना ताब्यात घेतल्याचा खोटा दावाही पाकिस्तानने केला आहे. तसेच पाकच्या माध्यमांकडूनही भारताची दोन विमाने पाडल्याचा दावा करण्यात येत आहे. या दाव्यासोबत जोधपूर येथे 2016 मध्ये क्रॅश झालेल्या भारतीय विमानाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्यात येत आहेत. तर या पसरविण्यात येणाऱ्या फेकन्यूजमध्ये एक व्हिडीओ ओडिशामधील विमान अपघाताचा असून काही फोटो राजस्थानच्या बारनेर येथील विमान अपघाताचे आहेत.
विशेष म्हणजे पाकिस्तानच्या माहिती मंत्रालयानेही खोटाच व्हिडीओ शेअर करत हा दावा केला आहे. तर पाकिस्तान रेडिओच्या ट्विटर अकाऊँटवरुनही ही खोटी बातमी पसरवण्यात आली आहे. त्यामुळे पाकिस्तान हे फेकिस्तान बनल्याचं दिसून येतंय. दरम्यान, पाकिस्तानच्या मीडिया आणि सरकारकडून या खोट्या बातम्या पसरविण्यात आल्याने तेथील सोशल मीडियावरही हा व्हिडीओ अन् फोटो व्हायरल झाले आहेत. पाकिस्तानी सैन्याकडून भारताचे एकही विमान पाडण्यात आलं नसून पाकिस्तानकडून ही फेकन्यूज चालविण्यात येत आहे. कारण, भारतीय सैन्याकडून या वृत्ताला अद्याप कुठेही दुजोरा देण्यात आला नाही.