जम्मू/श्रीनगर : विंग कमांडर अभिनंदन वर्धमान भारतात परतले असले तरी दोन्ही देशांच्या सीमेवर अद्याप तणाव आहे. पाकिस्तानकडून दोन दिवसात ४१ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. शुक्रवारी रात्रीपासून शनिवार सकाळपर्यंत पाकिस्तानकडून जोरदार गोळीबार व उखळी तोफांचा मारा करण्यात आला. यात पूंछ जिल्ह्यात एकाच कुटुंबातील तीन जण मरण पावले व दोघे जखमी झाले. मेंढर, उरी व पूंछ जिल्ह्यातील नियंत्रण रेषेपाशी पाकिस्तानी रेंजर्सने गोळीबार केला. पाकिस्तानी रेंजर्स आता रहिवासी भागांवर गोळीबार करीत आहेत.
पाकचा गोळीबार; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2019 3:10 AM