पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी भारत दौऱ्यावर येणार आहेत. बिलावल यांची ही भेट ४ मे रोजी होणार आहे. २०१४ मध्ये तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यानंतर सत्ताधारी पाकिस्तानी नेत्याची ही पहिलीच भारत भेट आहे.
Rahul Gandhi : राहुल गांधींना मोठा धक्का, सूरत न्यायालयाने याचिका फेटाळली
चीनच्या नेतृत्वाखालील शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनची बैठक भारतात ४ मे रोजी होणार आहे. या संघटनेत चीन, रशिया, पाकिस्तान, कझाकिस्तान, उझबेकिस्तान, किर्गिस्तान आणि ताजिकिस्तान यांचा समावेश होता, नंतर भारतही त्यात सामील झाला. यावेळी एससीओची बैठक भारतात घेण्याचे ठरल्यावर पाकिस्तानने आक्षेप घेतला, मात्र आता या बैठकीत पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो सहभागी होणार असल्याची माहिती मिळत आहे.
बिलावल एससीओच्या बैठकीत सहभागी होणार असल्याची चर्चा पाकिस्तानी माध्यमांमध्येही सुरू आहेत. बिलावल भुट्टो हे पाकिस्तानच्या सर्वात तरुण मंत्र्यांपैकी एक आहेत. त्यांचे वय ३४ वर्षे आहे. ते पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांचे पुत्र आहेत. बिलावल यांचा जन्म २१ सप्टेंबर १९८८ रोजी पाकिस्तानातील कराची शहरात झाला. त्यांनी परदेशातून शिक्षण पूर्ण केले. २७ एप्रिल २०२२ रोजी बिलावल यांची देशाचे ३७ वे परराष्ट्र मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली.
भुट्टो अनेकदा भारताविषयी टोकदार विधाने करतात बिलावल भुट्टो हे त्यांच्या 'भारतविरोधी' वक्तव्यामुळे पाकिस्तानच्या राजकारणात चर्चेत आहेत. अनेक वर्षांपासून ते काश्मीरबद्दल टीकाटिप्पणी करत आहेत. संयुक्त राष्ट्रात त्यांनी वारंवार काश्मीरवरुन भारतावर टीका केली.