शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
5
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
6
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
7
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
8
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
9
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
10
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
11
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
12
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
13
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
15
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
16
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
17
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
18
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

"एस जयशंकर यांनी स्वतःच सांगितले की..."; भारतासोबतच्या संबंधावर पाकिस्ताने मांडली स्पष्ट भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2024 1:10 PM

भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या शिखर परिषदेसाठी पाकिस्तानात जाणार आहेत.

S Jaishankar Pakistan Visit: आगामी शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन शिखर परिषदेच्या निमित्ताने भारतासोबत द्विपक्षीय चर्चेची शक्यता पाकिस्तानने फेटाळून लावली आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या परिषदेच्या भेटीदरम्यान भारतासोबत कोणतीही द्विपक्षीय चर्चा होणार नसल्याचे पाकिस्तानने मंगळवारी स्पष्ट केले. या शिखर परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानला जाणार आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली भारत सरकारचे एक शिष्टमंडळ इस्लामाबादला जाणार आहेत. 

भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पाकिस्तानला भेट देणार असल्याची गेल्या आठवड्यात घोषणा करण्यात आली. या घोषणेच्या दुसऱ्याच दिवशी परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी त्यांच्या पाकिस्तान भेटीसंदर्भात एक मोठे विधान केले आमचा आगामी पाकिस्तान दौरा द्विपक्षीय चर्चेसाठी नसून बहुपक्षीय कार्यक्रमासाठी असेल. यावेळी पाकिस्तानशी संबंध सुधारण्याच्या मुद्द्यावर बोलणार नाही, असे जयशंकर यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर पाकिस्ताननेसुद्धा याबाबत भाष्य करत अशी कोणतीही चर्चा होणार नसल्याचे म्हटलं आहे.

एस जयशंकर यांच्या भेटीबद्दल विचारले असता, पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाच्या प्रवक्त्या मुमताज झहरा बलोच यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. "भारतीय परराष्ट्र मंत्र्यांनी ५ ऑक्टोबर रोजी केलेले विधान  तुम्ही लक्षात घ्यावे अशी माझी इच्छा आहे, ज्यात त्यांनी सांगितले की, त्यांचा आगामी इस्लामाबाद दौरा एका बहुपक्षीय कार्यक्रमासाठी आहे. पाकिस्तान-भारत संबंधांवर चर्चा करण्यासाठी नाही. त्यांचे हे विधान स्वतःच संकेत देत आहे," असे मुमताज झहरा बलोच म्हणाल्या.

दरम्यान, परराष्ट्र मंत्र्यांची ही भेट महत्त्वाची मानली जात होती कारण नऊ वर्षांनी भारतीय परराष्ट्र मंत्री पाकिस्तानात जाणार होते. याआधी सुषमा स्वराज यांनी २०१५ मध्ये परराष्ट्र मंत्री असताना इस्लामाबादला भेट दिली होती. शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेश कौन्सिल ऑफ हेड्स ऑफ गव्हर्नमेंट बैठकीसाठी ऑगस्टच्या सुरुवातीला भारताला पाकिस्तानकडून निमंत्रण मिळाले होते. यापूर्वी मे २०२३ मध्ये पाकिस्तानचे तत्कालीन परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी गोव्यात याच बैठकीसाठी भारत दौऱ्यावर आले होते.

भारत आणि पाकिस्तानमधील सर्व पातळीवरील संबंध सर्वात खालच्या स्तरावर आहेत. २०१९ मध्ये जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्यानंतर इस्लामाबादने नवी दिल्लीशी राजनैतिक संबंध कमी केले आहेत. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने फेब्रुवारी २०१९ मध्ये पाकिस्तानातील बालाकोट येथे जैश-ए-मोहम्मद दहशतवादी प्रशिक्षण शिबिरावर हल्ला केल्यानंतर संबंध आधीच ताणले गेले होते. पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ४० हून अधिक जवान शहीद झाले होते.

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानS. Jaishankarएस. जयशंकर