ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 4 - भारत-न्यूझीलंडदरम्यान झालेल्या कोलकाता कसोटीत भारताने 178 धावांनी विजय मिळवत न्यूझीलंडचा पराभव झाला. मात्र या सामन्यानंतर सोशल मिडीयावर ख-या अर्थाने पाकिस्तानच हारला अशा आशयाचे मेसेज पोस्ट होत आहेत. न्यूझीलंडला नमवत भारताने कसोटी क्रमवारीत पाकिस्तानकडून पहिलं स्थान हिसकावून घेतलं. त्यानंतर सोशल मिडीयावर पाकिस्तानची चांगलीच खिल्ली उडवण्यात येत आहे.
एक नजर सोशल मिडीयावर प्रतिक्रियांवर
भारताने पाकिस्तानकडून अव्वल स्थान हिसकावल्यानंतर पाकिस्तानने प्रत्युत्तर देण्याची तयारी चालवली आहे. आता आणखी 100 दहशतवाद्यांना त्यांनी प्रशिक्षण द्यायला सुरूवात केली.
India overtake Pakistan to bcm Number one in ICC Test Rankings. Pak decides to give India a befitting reply..by training 100 more Terrorists— Babu Bhaiyaa (@Babu_Bhaiyaa) October 3, 2016
पाकिस्तान भारताला म्हणालं, तुम्ही कसोटी क्रमवारीत आमच्या पुढे गेलात पण दहशतवादामध्ये आम्हीच अव्ल स्थानी कायम राहणार
Meanwhile Pak To India:"You Can Dethrone Us From No. 1 Position In Test Cricket, But We'll Always Be Number 1 In Terrorism".#INDvNZ#INDvsNZ— Sir Ravindra Jadeja (@SirJadejaaaa) October 3, 2016
भारतामुळे पाकिस्तानची क्रमवारी घसरली आता कोहलीच्या घरी धमकी देणारा फुगा भेटला तर आश्चर्य वाटणार नाही.
पाकिस्तानची तर कसोटी क्रमवारीपण चायनिज निघाली
And we are No.1 again #indvsnz