व्यंकटेश केसरीलाेकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : पंजाब विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना पाकिस्तान, खलिस्तान, राष्ट्रीय सुरक्षेचे मुद्दे पुन्हा समोर येत आहेत. भाजप आणि त्याचे मित्र पक्ष या मुद्यांभोवती प्रचार करण्याची, तर काँग्रेस, आम आदमी पक्ष (आप) आणि इतर राजकीय पक्ष मतांसाठी कल्याणकारी योजना, आकर्षक आश्वासनांचा आधार घेतील, अशी अपेक्षा आहे.
पाकिस्तानी आणि खलिस्तानी समर्थकांचा कट आणि देशाला दंगलींच्या आगीत लोटण्याचा काँग्रेसचा खेळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कसा उधळून लावला, हे भाजपने आधीच सांगून प्रचार मोहिमेला सुरुवात केली आहे. मोदी हे भाजप आणि त्याच्या मित्र पक्षांसाठी स्टार प्रचारक असतील तरी ते किती सभा घेतील व भाजपविरोधकांना किती वेगळे पाडतील किंवा एकत्र आणतील हे स्पष्ट नाही.
पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग हे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांच्यावर ते पाकिस्तानवादी असल्याची टीका करीत आले आहेत, तर काँग्रेसचे नेते अमरिंदर सिंग यांच्या पाकिस्तानी महिला पत्रकाराशी असलेल्या मैत्रीचा उल्लेख करून प्रतिवाद करीत आहेत.
काँग्रेस एकाच वेळी ३ आघाड्यांवर लढतेयप्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांना पक्षाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून समोर आणले जावे, असे वाटते, तसेच ते आपल्या समर्थकांना तिकिटे मिळावीत यासाठी आग्रही आहेत.
केंद्रीय नेत्यांचा पाठिंबा असलेले वेगवेगळे गट आप, शिरोमणी अकाली दल, बहुजन समाज पक्ष आणि कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नेतृत्वाखालील भाजप व अकाली दलाचा एक गट आणि शेतकऱ्यांनी जर निवडणूक लढण्याचे ठरवले, तर मतदानाचे पारंपरिक गणित बिघडून जाऊ शकते.