ऑनलाइन लोकमत
जम्मू काश्मीर, दि. 27 - पाकिस्तानकडून वारंवार होणारं शस्त्रसंधीचं उल्लंघन अद्यापही सुरुच आहे. आर एस पुरा सेक्टरमधील भारतीय चौक्यांवर पाकिस्तानकडून गोळीबार सुरु असल्याची माहिती बीएसएफच्या डीआयजींनी दिली आहे. आरएसपुरा, अरनिया सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून रात्री 2 वाजल्यापासून गोळीबार आहे. गोळीबारात गेल्या 24 तासात एकूण 10 जण जखमी झाले असून बीएसएफचा एक जवान शहीद झाला आहे. जखमी जवानाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र उपचारावेळीच त्यांचं निधन झालं. जखमींमध्ये एकाच कुटुंबातील सात महिलांचा समावेश आहे.
भारताने नियंत्रण रेषा पार करुन केलेल्या सर्जिंकल स्ट्राईकनंतर पाकिस्तानकडून सतत शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जात आहे. शस्त्रसंधी उल्लंघन करण्याची ही 40वी वेळ आहे. स्थानिक प्रशासनाने सीमारेषेजवळील शाळांना तसंच ग्रामस्थांना सतर्क राहण्यास सांगितलं आहे.
#FLASH: Ceasefire violation by Pakistan in Jammu and Kashmir's RS Pura sector this morning, six civilians injured in mortar shelling.— ANI (@ANI_news) October 27, 2016
मंगळवारीही पाकिस्तानने शस्त्रसंधी उल्लंघन केलं होतं. पाकिस्तानी रेंजर्सनी शस्त्रबंदीचे उल्लंघन करीत जम्मूतील आंतरराष्ट्रीय सीमेलगतच्या आर.एस. पुरा भागात मंगळवारी रात्रभर उखळी तोफांच्या भडिमारासह गोळीबार केला. पाकिस्तानच्या बाजूने डागलेल्या तोफगोळ्याचा स्फोटात सीमा सुरक्षा दलाचा एक अधिकारी जखमी झाला. रात्रभर जम्मूजवळील आरएसपुरा आणि अरनिया सेक्टरमधील बीएसएफ पोस्टवर पाकिस्तानकडून फायरिंग सुरु होती. बीएसएफनेही पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देत असून पाच ते सहा पाकिस्तानी रेंजर्स उद्ध्वस्त केले. तसंच तीन पाकिस्तानी जवानही ठार केले.
One Head Constable who was injured by a splinter in shelling(by Pak) this morning in Abdullian(J&K), later succumbed to injuries: BSF— ANI (@ANI_news) October 27, 2016