ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 7 - पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र म्हणून घोषित करण्यास अमेरिकेने नकार दिला आहे. अर्थात, भारताला धोका असलेले दहशतवादी तळ उध्वस्त करण्यासाठी पाकिस्तानसोबत चर्चा सुरू ठेवण्यात येईल असे अमेरिकेने स्पष्ट केले असल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे.
काश्मिर प्रश्नावर भारत व पाकिस्तान दोघांनी चर्चा करावी आणि तणाव कमी करावा असा सल्लाही अमेरिकेने दिला आहे. अमेरिकी सरकारचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी पाकिस्तानने अण्वस्त्रे दहशतवाद्यांपासून सुरक्षित ठेवली असावीत अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र म्हणून विधेयक आल्याचं आपल्याला तरी माहीत नाही असं किर्बी म्हणाले.
काश्मिर प्रश्नावर अमेरिकेच्या भूमिकेत बदल झाला नसून हा प्रश्न भारत व पाकिस्तानने सोडवायचा आहे अशीच आपली भूमिका असल्याचेही किर्बी यांनी स्पष्ट केले आहे.
आणखी वाचा...