जोधपूर : पाकिस्तानात हिंदू म्हणून होणारा छळ व फरपटीतून सुटका करून घेण्यासाठी जोगदास (८१) यांची अनेक वर्षांपासून भारतात यायची इच्छा होती. परंतु भारतात आल्यानंतरही त्यांचे प्रश्न सुटलेले नाहीत.हिंदू बहुसंख्येच्या भारतात या बहुसंख्य पाकिस्तानी हिंदूंचे काही स्वागत होत नाही. ‘काम नाही, घर नाही, ना पैसा, ना अन्न. तेथे आम्ही शेतात काम करतो, आम्ही तेथे शेतकरी होतो. परंतु येथे आम्हाला लोक जगण्यासाठी खडक फोडायला लावतात,’ असे जोगदास म्हणाले. आमच्यासाठी फाळणी अजून पूर्ण झालेली नाही.पाकमधील हिंदूंना अजूनही भारतात परत यायचे आहे. पणजे इथे आले आहेत, त्यांना इथे काहीही कामच मिळत नाही, असे जोगदास म्हणाले. जोगदास जोधपूरच्या जवळ असलेल्या छावणीत राहतात. भारताची फाळणी होऊन ७० वर्षे झाली. मानवी इतिहासात इतक्या प्रचंड संख्येने मानवाचे स्थलांतर प्रथमच या फाळणीने घडवून आणले. तरीही पाकिस्तानातून हिंदू भारतात आजही येत आहेत. पाकिस्तानातहजारो हिंदू सीमेनजीकच्या तात्पुरत्या छावण्यांत राहतात. त्यांना काम करण्याचा कोणताही कायदेशीरनाही. असंख्य जणांना दुसरा पर्याय नसल्यामुळे ते जेथे राहतात. तेथून जवळच असलेल्या दगडांच्या खाणींमध्ये त्यांना काम करावे लागत आहे.१९४७मध्ये भारताची फाळणी झाली आणि १५ दशलक्ष लोक आपल्या मूळ जागेपासूनदुरावले. फाळणीने मोठा हिंसाचार घडवला. दहा लाख लोक मारले गेले. रक्तरंजित गोंधळात काही हिंदू आणि शीख नव्याने झालेल्यापाकिस्तानातून बाहेर पडले तर मुस्लीम पाकिस्तानात गेले. काही तिथेच राहिले. भारतात अशा मुस्लिमांबाबत शंका घेतली जाते, तर पाकिस्तानमध्ये बिगरमुस्लिमांना त्रास सहन करावा लागतो. (वृत्तसंस्था)
पाकिस्तानात अन्याय अन् भारतातही स्वागत नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2017 1:26 AM