शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत मुसळधार पाऊस, लोकल सेवा खोळंबली, सखल भागात साचले पाणी, उद्या शाळांना सुट्टी!
2
हिजबुल्लाहचा पलटवार! इस्रायली निवासी भागांना केलं लक्ष्य, ४० रॉकेट डागले
3
मुंबईत पावसाचं रौद्ररुप, सकाळपर्यंत रेड अलर्ट, अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना
4
'मागितले असते तर सर्व काही दिले असते', अजित पवारांच्या बंडखोरीवर सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या
5
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
6
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
7
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
8
'पीओकेमधून आलेले निर्वासित...', काश्मिरी पंडितांबाबत बोलताना राहुल गांधींची जीभ घसरली
9
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
10
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
11
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
12
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
13
"मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण…’’ अजित पवार यांनी सांगितली नेमकी अडचण  
14
कोहली-रोहितला 'स्पेशल ट्रीटमेंट'? माजी क्रिकेटर थेट BCCI वर कडाडला
15
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
16
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
17
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
18
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
19
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
20
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?

लोकसभेआधी पुन्हा काहीतरी घडू शकतं; इम्रान खान यांना 'मनसे' संशय

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2019 10:14 AM

निवडणुकीआधी पुन्हा हल्ला होईल, असं राज ठाकरेंनी सभेत म्हटलं होतं.

इस्लामाबाद: भारतात लोकसभेची निवडणूक होईपर्यंत भारत-पाकिस्तान यांच्यातील संबंध तणावपूर्ण राहतील, असं पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटलं आहे. निवडणूक होण्याआधी आणखी काहीतरी घडू शकतं, असा संशयदेखील त्यांनी व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीआधी पुलवामासारखा आणखी एखादा हल्ला घडवला जाईल, असं भाकीत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच वर्तवलं होतं. जम्मू-काश्मीरमधील पुलवामात 14 फेब्रुवारीला सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी आत्मघाती हल्ला केला. यानंतर भारत-पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. याचाच संदर्भ देत भारत-पाकिस्तानवर अद्यापही युद्धाचं सावट  कायम असल्याचं खान म्हणाले. 'निवडणुकीआधी मोदी सरकार आणखी काहीतरी करू शकतं,' अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. 'धोका अद्याप टळलेला नाही. भारतात निवडणूक होईपर्यंत परिस्थिती तणावपूर्ण राहील. भारताकडून आक्रमण झाल्यास ते थोपवून धरण्यासाठी आम्ही तयार आहोत,' असं इम्रान खान यांनी म्हटलं. पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलानं 26 फेब्रुवारीला एअर स्ट्राइक केला. हवाई दलाच्या 12 मिराज-2000 विमानांनी पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर आणि पाकिस्तानातील बालाकोटवर बॉम्ब टाकले. मध्यरात्री तीन ते साडेतीनच्या दरम्यान भारतीय हवाई दलानं ही धाडसी कारवाई केली. यामध्ये दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करण्यात आले. मात्र यामध्ये नेमके किती दहशतवादी मारले गेले, याची माहिती हवाई दलानं दिली नाही. काँग्रेससह तृणमूल काँग्रेसनं या कारवाईचे पुरावे मागितल्यानं राजकारण तापलं होतं. 

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तानindian air forceभारतीय हवाई दलIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकBJPभाजपाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्ला