नवी दिल्ली : पाकिस्तानने आपल्याच भूमीवरील दहशतवाद्यांची आश्रयस्थाने नष्ट करण्यासाठी आणखी प्रयत्न केले पाहिजेत आणि दहशतवादी कारवायांत गुंतलेल्या स्थानिक गटांविरुद्ध कठोरपणे कारवाई केली पाहिजे, असे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री जॉन केली बुधवारी म्हणाले. पाकिस्तान स्वत: दहशतवादाचा बळी ठरला असून त्यात त्याला ५० हजार लोक गमवावे लागले आहेत, हे सांगून ते म्हणाले की, पाकिस्तान जेव्हा कारवाई करतो त्यावेळी त्याला फटका बसतो व कारवाई पुढे सुरू ठेवणे आणखी कठीण बनते. आयआयटी-दिल्लीतील सत्रात जॉन केरी बोलत होते. ते म्हणाले, इस्लामिक स्टेट्स अल कायदा, जैश ए मोहम्मद यांच्याविरुद्ध कोणताही एक देश एकट्याने लढू शकत नाही. आम्ही त्यावर काम करीत आहोत. मी या विषयावर खूप प्रयत्न करीत आहे. केरी यांचा भारतातील मुक्काम आणखी दोन दिवसांनी वाढला आहे. मोदी यांची बुधवारी दुपारी भेट घेतल्यानंतर केरी यांच्या भारताचा अधिृकत दौरा संपला होता. बुधवारी सायंकाळी ५.३० वाजता ते निघणार होते. ते शुक्रवारी किंवा शनिवारी जी-२० शिखर परिषदेसाठी चीनला रवाना होतील. (लोकमत न्यूज नेटवर्क)
पाकने दहशतवादी तळ संपवावेत!
By admin | Published: September 01, 2016 4:27 AM