नवी दिल्ली : भारतात हेरगिरी आणि दहशतवादी संघटनांशी संबंध ठेवल्याबद्दल पाकिस्तानला त्यांच्या दिल्लीतील उच्चायुक्त कार्यालयातील ५0 टक्के कर्मचारी सात दिवसांत कमी करण्याचे आदेश भारताने मंगळवारी दिले. भारतही आपल्या इस्लामाबादमधील उच्चायुक्त कार्यालयातील कर्मचारी ५0 टक्क्याने कमी करणार आहे.पाकिस्तान उच्चायुक्त कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्याला परराष्ट्र मंत्रालयाने बोलावून वरील सूचना दिल्या. इस्लामाबादच्या भारतीय उचायुक्त कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे पाकिस्तानी यंत्रणांनी मध्यंतरी अपहरण केले होते आणि त्या दोघांना पोलीस ठाण्यात डांबून ठेवले होते. त्याबद्दल भारताने कडक शब्दांत समज दिल्यानंतर पाकिस्तानने दोघांची सुटका केली, याचा उल्लेख आपल्या परराष्ट्र मंत्रालयाने केला आहे.>व्हिएन्ना कराराचे उल्लंघन केल्याची टीकापाकिस्तानने व्हिएन्ना कराराचे उल्लंघन केल्याची टीकाही भारताने केली आहे. तसेच सीमेपलीकडून होणारा हिंसाचार आणि दहशतवाद्यांना केली जाणारी मदत याबद्दलही पाकिस्तानला जबाबदार धरले आहे. त्यामुळे पाकिस्तानला त्यांच्या उचायुक्त कार्यालयातील कर्मचारी वर्ग ५0 टक्क्याने कमी करण्यास सांगितले असून, तसेच भारतही करणार आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
पाकने दिल्लीतील ५0 टक्के कर्मचारी कमी करावेत, भारताचा आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 4:22 AM