ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 4 - भारताने केलेल्या सर्जिंकल स्ट्राईकनंतर एकीकडे पाकिस्तानी कलाकारांनी माफी मागण्यास नकार दिला असताना अदनान सामीने मात्र उघडपणे ट्विटरच्या माध्यमातून भारताच्या कारवाईबद्दल जवान आणि पंतप्रधानांचं अभिनंदन केलं होतं. मात्र एकेकाळी पाकिस्तानचा नागरिक असणा-या अदनान सामीने केलेलं हे कौतुक पाकिस्तानी नागरिकांना रुचलं नाही. त्यांनी अदनान सामीला देशद्रोही संबोधत टार्गेट करण्यास सुरुवात केली. अदनान सामीने टीका करणा-यांना चोख उत्तर दिलं आहे. पाकिस्तानने भारताचे आभार मानले पाहिजेत असा सल्ला अदनान सामीने दिला आहे.
'माझे ट्विट दोन्ही देशांना आणि संपुर्ण जगाला धोका असणा-या शत्रुविरोधात होते. दहशतवाद्यांचा खात्मा केल्याबद्दल पाकिस्तानने भारताचे आभार मानले पाहिजेत. गेली अनेक वर्ष पाकिस्तानच आपण दहशतवादाचे पीडित असल्याचं सांगत आहे. जेव्हा तुमचा शेजरचा देश दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी मदत करतो त्याची साधी दखलही तुम्ही घेत नाही', असं अदनान सामी बोलला आहे.
Pakistanis r outraged by my earlier tweet. Their outburst clearly means they see Terrorist & Pakistan as the same! #selfgoal#stopterrorism— Adnan Sami (@AdnanSamiLive) September 30, 2016
आपल्या ट्विटवर स्पष्टीकरण देत आपण पाकिस्तानचं नावही घेतलं नव्हतं असं अदनान सामीने सांगितलं आहे. त्यांचा त्यांनीच अंदाज लावला आणि त्यामुळे पाकिस्तान आणि दहशतवादाला एकाच नजरेनं पाहिलं जात आहे असं लिहिल्याचं अदनान सामीने सांगितलं. पुन्हा पाकिस्तानला परत जावं लागल्यास मला अजिबत भीती वाटणार नाही. जर मी कोणाला घाबरत आहे तर ते फक्त देवाला. जर माझ्या नशीबात असेल तर मी पुन्हा पाकिस्तानात जाईन, आणि जाताना घाबरणार नाही असं अदनान सामी बोलला आहे,