शहरं
Join us  
Trending Stories
1
निकालानंतर सत्तेची समीकरणं बदलणार?; ; अजित पवार गटाच्या आणखी एका नेत्याचा दावा
2
निर्लज्जपणाचा कळस! ऋतुराज पंचांसह खेळाडूंवर संतापला; 'महाराष्ट्रा'साठी आवाज उठवला
3
Maharashtra: "अजित पवार जोपर्यंत भाजपसोबत, तोपर्यंत एकत्र येणे..."; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
4
“जो शब्द दिला तो पाळतात, अजित पवार मर्द माणूस”; नवाब मलिकांनी केले तोंडभरून कौतुक
5
Vidhan Sabha 2024: उमरेडमध्ये 'पारवें'चे डबल इंजिन धावणार की, काँग्रेसचे 'दलित कार्ड' चालणार?
6
भारताविरूद्धच्या मालिकेआधी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का; दुखापतग्रस्त खेळाडूने मैदान सोडले!
7
शेअर बाजारात २ दिवसांत कमावलं, ते काही तासांत गमावलं! या सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण
8
काँग्रेसचा प्रचार धडाका! राहुल गांधी, प्रियंका गांधी, खरगेंसह प्रमुख नेते महाराष्ट्रात
9
"जिवंत राहिले तर...!"; सुजलेल्या चेहऱ्यासह फोटो शेअर करत साध्वी प्रज्ञा सिंह यांचा काँग्रेसवर आरोप
10
सौरव गांगुलीचा सल्ला अन् भारताच्या स्टार खेळाडूनं 'निवृत्ती'चा निर्णय बदलला, म्हणाला...
11
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येबाबत मोठी अपडेट, आरोपींनी आधीच शस्त्रे लपवली होती, पुण्यातून आणखी दोन जणांना अटक
12
कोण आहेत भारतीय वंशाचे कश्यप 'काश' पटेल? डोनाल्ड ट्रम्प यांचे विश्वासू, जे बनू शकतात CIA चीफ!
13
Gold Rates Today : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी 'गुड न्यूज', जोरदार आपटलाय भाव! पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट
14
३५४ मतदार... झोपडीतील मतदान केंद्र...; २० किमी पायपीट करून निरीक्षकांनी केली पाहणी
15
आज दहशतवादी गांधी कुटुंबाची मदत मागताहेत; 'त्या' पत्रावरुन स्मृती इराणींचा हल्लाबोल
16
Shah Rukh Khan : "माझा फोन २ नोव्हेंबरला चोरीला गेला"; शाहरुखला धमकावल्याचा आरोप असलेल्या फैजानचा दावा
17
सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी विचारला घटनात्मक प्रश्न; AI Lawyer दिले ‘असे’ उत्तर, Video व्हायरल
18
"मी एक हिंदू आहे त्यामुळे..."; एकता कपूर असं काय म्हणाली की नेटकऱ्यांनी केला कौतुकाचा वर्षाव
19
अली फजल अन् रिचा चड्डाच्या लेकीचं नाव आलं समोर, अर्थही आहे खूपच खास
20
Truecaller कंपनीवर आयकर विभागाचा छापा, कार्यालयाची घेतली झाडाझडती

पाकिस्तानकडून ठाणी, खेड्यांवर गोळीबार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2019 5:44 AM

पाकिस्तानच्या लष्कराने बुधवारी जम्मू आणि काश्मीरच्या राजौरी आणि पूंछ जिल्ह्यांत नियंत्रण रेषेवरील डझनभर ठाणी आणि खेड्यांवर तोफांचा मारा केला.

जम्मू : पाकिस्तानच्या लष्कराने बुधवारी जम्मू आणि काश्मीरच्या राजौरी आणि पूंछ जिल्ह्यांत नियंत्रण रेषेवरील डझनभर ठाणी आणि खेड्यांवर तोफांचा मारा केला. संपूर्ण रात्रभर सुंदरबनी (राजौरी जिल्हा) सेक्टरमध्ये जोरदार गोळीबार आणि तोफमारा सुरू होता तर बुधवारी पहाटे कृष्णा घाटी (जिल्हा पूंछ) सेक्टरमध्ये तो सुरू झाला, असे अधिकाऱ्याने सांगितले.या माऱ्याला भारतीय लष्करानेही चोख प्रतिउत्तर दिले व दोन्हीकडून जोरदार गोळीबार सुरू राहिल्यामुळे सीमेवर राहणाऱ्यांच्या मनात घबराट निर्माण झाली. भारतीय बाजूकडे जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. पाकिस्तानने मंगळवारीही नौशेरा आणि सुंदरबनी आणि कृष्णा घाटीत गोळीबार केला होता. नौशेरा सेक्टरमध्ये दोन्ही बाजुंकडून गोळीबार तीन तास सुरू राहिला त्यात एक जवान जखमी झाला. कृष्णा घाटीत गोळीबार सकाळी सहा ते रात्री ८.१५ पर्यंत सुरू होता. सुंदरबनी सेक्टरमध्ये मंगळवारी रात्री साडेआठ वाजता गोळीबार सुरू होऊन बुधवारी पहाटे साडेचारला थांबला.६0 वेळा केला गोळीबारगेल्या आठवड्यात राजौरी आणि पूंछमध्ये नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून सुमारे ६० वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन होऊन एका कुटुंबातील तीन जणांसह चार नागरिक ठार तर अनेक जण जखमी झाले, असे हा अधिकारी म्हणाला.