शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वेन्स यांची भेट, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
2
"जो हाल तेरे बाप का हुआ, वही तेरा होगा...!"; झिशान सिद्दीकी यांना जिवे मारण्याची धमकी 
3
पंतप्रधान मोदींनी दिलं खास गिफ्ट, खुश झाली अमेरिकन उपाध्यक्षांची मुलं! बघा VIDEO
4
"राज ठाकरे यांना झुकवून युती होऊ शकते, असे मला वाटत नाही, कारण..."; उदय सामंत स्पष्टच बोलले 
5
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
6
काँग्रेसविरोधात भाजयुमोचे आंदोलन, संवेदनशील भागात तणाव
7
'यंदा कर्तव्य आहे' वाटतं? टॉस वेळी शुबमन गिलला बाउन्सर; हँडसम क्रिकेटरनं असा दिला रिप्लाय (VIDEO)
8
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार
9
GT चा 'ब्लॉकबस्टर शो' जारी; घरच्या मैदानावर खेळणाऱ्या गत चॅम्पियन KKR वर पडले भारी!
10
भाजपला कधी मिळणार नवीन अध्यक्ष? RSS आणि पक्षाच्या उच्च नेतृत्वात विचारमंथन सुरू...
11
40 वर्षांचे प्रेम अन् 80 व्या वर्षी बांधली लगीनगाठ; अनोख्या लग्नाची सर्वत्र चर्चा...
12
IPL 2025 KKR vs GT : रिंकूनं घेतला जबरदस्त कॅच! शुबमन गिलचं शतक हुकलं (VIDEO)
13
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
14
पत्नीने का उचलले टोकाचे पाऊल? पाहा माजी डीजीपींच्या हत्येची Inside Story...
15
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
16
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
17
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
18
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
19
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
20
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं

भारतामध्येही झालं होतं ट्रेनचं अपहरण, प्रवाशांना धरलं होतं ओलीस, अखेरीस...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 21:01 IST

Pakistan Train Hijack: पाकिस्तानमध्ये बलूच लिबरेशन आर्मीच्या दहशतवाद्यांनी एका प्रवासी ट्रेनचं अपहरण केल्याने जागतिक पातळीवर खळबळ उडाली आहे. दरम्यान, भारतामध्येही अशा प्रकारे काही वेळा प्रवाशांनी भरलेल्या ट्रेनचं अपहरण झाल्याच्या घटना घडल्या होत्या.

पाकिस्तानमध्ये बलूच लिबरेशन आर्मीच्या दहशतवाद्यांनी एका प्रवासी ट्रेनचं अपहरण केल्याने जागतिक पातळीवर खळबळ उडाली आहे. तसेच दहशतवाद्यांनी ओलीस धरलेल्या प्रवाशांमध्ये पाकिस्तानी लष्करातील सैनिक आणि अधिकारी असल्याने पाकिस्तान सरकराच्या तोंडचं पाणी पळालं आहे. दरम्यान, ट्रेनचं अपहरण होण्याची ही काही पहिलीच घटना नाही आहे. भारतामध्येही अशा प्रकारे काही वेळा प्रवाशांनी भरलेल्या ट्रेनचं अपहरण झाल्याच्या घटना घडल्या होत्या.

यातील एक घटना ६ फेब्रुवारी २०१३ रोजी घडली होती. त्यावेळी मुंबई-हावडा मार्गावर धावणाऱ्या जनशताब्दी एक्स्प्रेसचं अपहरण झालं होतं. या अपहरणाचा उद्देश जयचंद वैद्य अपहरणकांडातील आरोपी उपेंद्र सिंह उर्फ कबरा याची सुटका करणं हा होता. २००१ मध्ये व्यापारी जयचंद वैद्य यांच्या झालेल्या अपहरण प्रकरणामध्ये पोलिसांनी उपेंद्र सिंह उर्फ कबरा याला मुख्य आरोपी बनवण्यात आले होते. तुरुंगातून फरार झालेल्या काबरा याने जनशताब्दी एक्स्प्रेसला जवळपास १३ किलोमीटरपर्यंत ओलीस धरले होते. अखेर लष्कराच्या मदतीने ट्रेनमधून प्रवासांची सुखरूप सुटका करण्यात आली होती.

सन २००९ मध्ये सशस्त्र माओवाद्यांनी  भुवनेश्वर-राजधानी एक्स्प्रेसचं अपहणर केलं होतं. तेव्हा सुमारे ३०० ते ४०० माओवाद्यांनी संपूर्ण ट्रेनच ताब्यात ठेवली होती. शेकडो प्रवासी आणि रेल्वे कर्मचारी हे अनेक तासांपर्यंत ताब्यात राहिले होते. या अपहरणकांडांमध्ये छत्रधर नावाच्या माओवाद्याचं नाव समोर आलं होतं. त्याच्या इशाऱ्यावर हे अपहरणकांड घडवण्यात आलं होतं. माओवादी नेत्याच्या सुटकेसाठी  प्रवाशांना ओलीस धरण्यात आलं होतं. यादरम्यान, प्रवशांना मारहाण करून लुटालूट करण्यात आली होती.

तर जून २०१३ मध्ये माओवाद्यांनी बिहारमधील जमुई येथे गोळीबार करून ट्रेनवर ताबा मिळवला होता. तेव्हा धनबाद-पाटणा इंटरसिटी एक्स्प्रेसला अनेक तासांपर्यंत अपहरण करून ताब्यात ठेवले होते. माओवाद्यांना ड्रायव्हरला ओलीस धरत संपूर्ण ट्रेनवर ताबा मिळवला होता. त्यानंतर त्यांनी प्रवाशांची लुटालूट केली होती.   

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेCrime Newsगुन्हेगारी