नवी दिल्ली - पाकिस्तान ड्रोनचा वापर हा पंजाबमध्ये शस्त्रास्त्र पाठवण्यासाठी करत असल्याचे पंजाबपोलिसांना तपासात आढळले आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी हा प्रकार रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचे आवाहन रविवारी (22 सप्टेंबर) भारतीय हवाई दल आणि सीमा सुरक्षा दलाला केले आहे.
पोलीस उपमहासंचालक दिनकर गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'पाकिस्तान आयएसआय, पाकपुरस्कृत जिहादी आणि पाकिस्तानच्या नियंत्रणाखाली काम करणाऱ्या खलिस्तानवादी दहशतवादी संघटना यांनी अलीकडेच भारत-पाक सीमेपलीकडे पाठवलेल्या ड्रोनद्वारे शस्त्रास्त्र पोहोचवण्यात आल्याचा संशय आहे.'
पंजाब पोलिसांनी पाकिस्तान आणि जर्मनीतील एक दहशतवादी गट यांचा पाठिंबा असलेले पुनरुज्जीवित खलिस्तान जिंदाबाद फोर्सचे एक मॉड्यूलवर कारवाई केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आल्याची माहिती वृत्तसंस्थेने दिली आहे. पंजाब आणि आसपासच्या परिसरात दहशतवादी हल्ल्याचा कट रचत होते. पोलिसांनी AK-47 रायफल, सॅटेलाइट फोन आणि हँड ग्रेनेड यासारखा शस्त्रसाठा जप्त केला आहे. पोलीस याचा अधिक तपास करत आहेत.
भारतात दहशतवादी घातपात घडविण्यासाठी आलेलं दहशतवादी रॅकेट रविवारी पंजाब पोलिसांनी उद्ध्वस्त केले आहे. पाकिस्तान आणि जर्मनी येथील दहशतवादी संघटनांना पाठबळ देणाऱ्या खलिस्तान झिंदाबाद फोर्सच्या (केझेडएफ) दहशतवाद्यांच्या रॅकेटचे पंजाब पोलिसांनी कंबरडं मोडलं आहे. या दहशतवाद्यांकडे खूप मोठा शस्त्रसाठा सापडला आहे. 5 एके-47 रायफल, पिस्तूल, सॅटेलाईट फोन आणि हॅन्ड ग्रेनेड्ससह मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा पोलिसांनी जप्त केला आहे. अल कायदा या दहशतवादी संघटनेचा हा मोस्ट वाँटेड दहशतवादी मोहम्मद कलिमुद्दीन मुजाहिरला आसाम एटीएसने टाटा नगर रेल्वे स्टेशन येथून अटक केली आहे.
सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. श्रीनगर आणि आसपासच्या परिसरात जवळपास 24 दहशतवादी दिसल्याची माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. त्यानंतर आता गेल्या महिनाभरात तब्बल 60 विदेशी दहशतवादीजम्मू-काश्मीरमध्ये घुसले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सरकारी अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये 60 विदेशी दहशतवादी घुसले असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र जम्मू- काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंह यांनी स्थानिक तरुणांचे दहशतवादी गटांमध्ये भरतीचे होण्याचे प्रमाण आतापर्यंत सर्वात कमी प्रमाण असल्याचा दावा केला आहे. गेल्या 45 दिवसांत फक्त दोन जण दहशतवादी गटांमध्ये सामील झाले असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.