ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 13 - सीमारेषेवरील वाढत्या हल्ल्यांवरुन पाकिस्तानचे शेपूट वाकडेच असल्याचेच दिसत आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात येत आहे. शनिवारीदेखील जम्मू काश्मीरमधील नौशेरा सेक्टर येथे नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात दोन नागरिकांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी असल्याचे वृत्त आहे. सकाळीपासूनच नौशेरा परिसरातील कलसिया भागात पाकिस्ताननं तोफांचा मारा सुरू केला आहे. दरम्यान, भारतीय जवानदेखील पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देत आहेत.
गेल्या काही दिवसांमध्ये पाकिस्तानकडून करण्यात आलेले हल्ले
12 मे : अरनिया सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन
शुक्रवारी अरनिया सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून हल्ला करण्यात आला. या हल्ल्याला बीएसएफकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आले. दरम्यान, पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारात बीएसएफचा एक जवान जखमी झाला होता.
बीएसएफच्या प्रवक्त्यानं दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी सैन्याकडून सकाळी 7 ते 7.30 वाजण्याच्या दरम्यान गोळीबार करण्यात आला.
#UPDATE 2 civilians dead,3 injured in ceasefire violation by Pak in Nowshera sector. Evacuation halted in view of heavy shelling: DC,Rajouri— ANI (@ANI_news) May 13, 2017
10 मे : राजौरी सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून हल्ला
बुधवारी रात्री जवळपास 10.45 वाजण्याच्या सुमारास जम्मू काश्मीरमधील राजौरी सेक्टरमध्येही पाकिस्तानकडून हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाला होता तर तिचा पती जखमी झाला होता. आंतरराष्ट्रीय न्यायालयानं भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या मृत्यूदंडाच्या शिक्षेला स्थगित दिल्यानंतर पाकिस्तानकडून वारंवार गोळीबार करण्यात येत असल्याचं निदर्शनास आले आहे.
J&K: Ceasefire violation by Pakistan in Nowshera sector of Rajouri, heavy mortar shelling. pic.twitter.com/sSUUyihbkb— ANI (@ANI_news) May 13, 2017