- ऑनलाइन लोकमत
जम्मू काश्मीर, दि. 6 - पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं आहे. पुंछ जिल्ह्यातील शहापूर सेक्टरमध्ये मंगळवारी सकाळी पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. भारतीय सैन्यांनी जोरदार प्रत्युतर दिलं आहे. सध्या मिळालेल्या माहितीपर्यंत कोणीही जखमी झालेलं नाही.
'पाकिस्तानी सैन्यांनी रात्री 12 वाजून 10 मिनिटांनी फायरिंग करत शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. सीमारेषेवर असणा-या शहापूर सेक्टरमधील पोस्टवर त्यांनी हल्ला केला. त्यानंतर आम्ही लगेच चोख प्रत्युत्तर दिलं', अशी माहिती वरिष्ठ लष्कर अधिका-याने दिली आहे.
Ceasefire violation by Pakistan in Shahapur sector of Poonch district of J&K pic.twitter.com/Qc5UlZkKDd— ANI (@ANI_news) September 6, 2016