शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
2
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
3
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
4
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
5
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
6
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
9
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
10
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
11
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
12
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
13
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
14
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
15
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
16
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
17
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
18
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
19
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
20
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन

पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2024 6:05 AM

झारखंड येथील पलामू आणि गुमला येथे शनिवारी प्रचारसभांमध्ये मोदी म्हणाले की, पाकिस्तानला भलेही काँग्रेसचा शहजादा पंतप्रधान बनावा असे वाटत असेल; मात्र भारताच्या जनतेला समर्थ देशासाठी कणखर पंतप्रधान हवा आहे.

एस. पी. सिन्हा / विभाष झालोकमत न्यूज नेटवर्कपलामू : आमच्या सरकारने केलेले सर्जिकल स्ट्राइक व हवाई हल्ल्यांनी पाकिस्तान हादरला आहे. त्यामुळे काँग्रेसचा शहजादा भारताचा पंतप्रधान बनायला हवा अशी प्रार्थना पाकिस्तानमधील नेते करीत आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. त्यांनी राहुल गांधी यांचे नाव न घेता त्यांच्यावर ही टीका केली. 

झारखंड येथील पलामू आणि गुमला येथे शनिवारी प्रचारसभांमध्ये मोदी म्हणाले की, पाकिस्तानला भलेही काँग्रेसचा शहजादा पंतप्रधान बनावा असे वाटत असेल; मात्र भारताच्या जनतेला समर्थ देशासाठी कणखर पंतप्रधान हवा आहे. भारतावर केल्या जाणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांना पाकिस्तान पाठिंबा देत होता. भारतात काँग्रेसचे राज्य असताना पाकिस्तान अशा पद्धतीने वागत असे. मात्र नवभारताने पाकिस्तानला दयामाया दाखविली नाही. आम्ही त्यांच्यावर सर्जिकल स्ट्राइक तसेच हवाई हल्ले केले.  

मोदी म्हणाले की, देशात दहशतवादी हल्ला झाला की याआधी काँग्रेसची केंद्र सरकारे असहायपणे त्या स्थितीकडे पाहत असत. पण आता परिस्थिती बदलली आहे. आता पाकिस्तान स्वत:च्या रक्षणासाठी जगातील अनेक देशांकडे मदत मागत आहे. 

‘कोरोना काळात बिहारींना ‘इंडिया’च्या घटक पक्षांनी पळवून लावले’दरभंगा : पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारमधील दरभंगा येथील प्रचारसभेत शुक्रवारी म्हणाले की, कोरोना साथीच्या काळात दिल्ली व महाराष्ट्रातून बिहारी लोकांना पळवून लावण्याचे काम इंडिया आघाडीतील घटक पक्षांनी केले. त्याचे उत्तर आता या पक्षांनी दिले पाहिजे.मागील लोकसभा निवडणुकांत मतदारांनी आम्हाला दिलेल्या कौलामुळेच ३७० कलम रद्द करण्याचा निर्णय घेता आला. तसेच अयोध्येमध्ये श्रीरामाचे मंदिर उभारण्यात आले. मुस्लिमांना राखीव जागा देण्यासाठी राज्यघटनेमध्ये बदल करण्याचा काँग्रेसचा डाव आम्ही उधळून लावू, असे नरेंद्र माेदी म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४