नवी दिल्ली: देशातील कोरोना रुग्णांच्या वाढीचा वेग नियंत्रणात आला आहे. कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांचं प्रमाण ९५ टक्क्यांच्या पुढे गेलं आहे. सध्याच्या घडीला उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या दोन लाखांच्या खाली आहे. एका बाजूला कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असताना दुसऱ्या बाजूला कोरोना लसीच्या उत्पादनात भारतानं मोठी आघाडी घेतली आहे. जगातील अग्रगण्य सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं कोविशील्डच्या उत्पादनाचा वेग वाढवला आहे. तर भारत बायोटेकनं कोवॅक्सिनचं उत्पादन वेगानं सुरू केलं आहे. या दोन्ही कंपन्या निर्यातीच्या बाबतीतही आघाडीवर आहेत.कोरोना वॅक्सीनेशनसाठी बजेटमध्ये ३५ हजार कोटी रूपये, किती लोकांना फ्री मिळेल वॅक्सीन?जगातील अनेक देशांनी भारताकडे कोरोना लसींची मागणी केली आहे. पाकिस्तानदेखील भारतात तयार होणारी कोरोना लस मागवण्याच्या तयारीत आहे. पाकिस्तानला भारतीय लस स्वस्त पडेल. इतर देशांकडून कोरोना लस घेतल्यास पाकिस्तानला त्यावर अधिक खर्च करावा लागेल. कोरोना लसीसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेल्या कराराच्या माध्यमातून मिळेल. पाकिस्तानसोबतच इतरही अनेक देशांना भारत कोरोनावरील लस देणार आहे. कोरोनाच्या संकटात "या" देशांसाठी भारत ठरला देवदूत, लसीचे लाखो डोस केले गिफ्ट आखाती देशांना भारत कोरोना लसींचा पुरवठा करणार आहे. भारत ओमाणला १ लाख लसींचा पुरवठा करत आहे. तर पुढील आठवड्यात अफगाणिस्तानला ५ लाख डोज पाठवले जातील. याशिवाय निकाग्वाराला २ लाख, डॉमिनिकाला ७० हजार, बार्बाडोसला १ लाख, मंगोलियाला १.५ लाख डोज पाठवणार आहे. मात्र यासाठीची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही.इजिप्त, अल्जेरिया, युएई आणि कुवेतनं भारतात तयार झालेली कोरोना लस खरेदी केली आहे. सौदी अरेबिया, म्यानमार, बांगलादेशनंदेखील कोरोना लस खरेदी करण्यासाठी भारताशी संपर्क साधला आहे. या खरेदीला अद्याप भारत सरकारनं मंजुरी दिलेली नाही. भारतात तयार झालेल्या ऍस्ट्राझेनेका कंपनीच्या कोविशील्ड लसीचे ७० लाख डोज पाकिस्तानात पाठवले जाणार आहेत. हे डोज मोफत दिले जातील.
Corona Vaccine: भारत पाकिस्तानला देणार मदतीचा हात; संकट काळात शेजाऱ्यांना मोठा दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2021 3:56 PM