लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : तालिबानने अफगाणिस्तानमध्ये अंतरिम सरकार स्थापन केले असले तरी तालिबान अजूनही पाकिस्तानची गुप्तचर संस्थेच्या (आयएसआय) तावडीतून सुटलेली दिसत नाही. आयएआय आता भारताविरुद्ध आणखी एक कटकारस्थान रचण्याच्या तयारीत आहे. अफगाणमधील तुरुंगातून सुटलेल्या इस्लामिक स्टेट खुरासान प्रांतच्या (आयएसकेपी) अतिरेक्यांचा वापर करून पाकिस्ताची गुप्तचर संस्था (आयएसआय) भारतात हल्ले करण्यासाठी करु शकते.
गुप्तचर संस्थांनी अशी शंका व्यक्त केली की, पाकिस्तानची गुप्तचर संस्था अफगाणमधील तुरुंगातून सुटलेल्या आयएसकेपीच्या अतिरेक्यांच्या हाती तालिबानकडून मिळालेला शस्रसाठा सोपवू शकते.राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) अहवालातूनही आयएसकेपीचा कमांडर मुन्सिब अफगाणिस्तान-पाकिस्तानच्या सीमेवर असल्याची माहिती मिळते.