मुंबई : बॉर्डरच्या सोबतीने आता सोशल मीडियाच्या माध्यमातूनदेखील पाकिस्तान भारताविरूद्ध काही नकारात्मक भावना भडकवण्याचा प्रयत्न करत आहे. एका भारतीय मुलीचा फोटो मॉर्फ़ करून भावना भडकवण्याचा प्रयत्न केल्याचा एक प्रकार नुकताच उघड झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कवलप्रीत कौर या मुलीने भारताच्या संविधानाच्या काही मुल्यांचा प्रसार करणारं प्लेकार्ड हातामध्ये घेऊन एक फोटो क्लिक केला होता. तो तिनं सोशल मिडियावरही टाकला. मात्र काही दिवसांनी त्या प्लेकार्डावरील संदेश बदलला आहे हे कवलप्रीतच्या लक्षात आलं. तिने ट्विटरवर या अकाऊंटबाबत माहिती दिली. कवलप्रीतने टॅग केलंल हॅन्डल हे पाकिस्तानच्या डिफेन्स विभागाचं व्हेरिफाईड मार्क केलेलं अकाऊंट होतं. ट्विटरनेही त्यावर कडक कारवाई करत ट्विटनं पाकिस्तान डिफेन्सचं अकाऊंट सस्पेंड केलं आहे.
भारतीय मुलीच्या फोटोसोबत पाकिस्तान डिफेन्सची छेडछाड! ट्विटरनं केली कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2017 10:39 AM