नवी दिल्ली : इंटर-सर्व्हिसेस इंटेजिलन्सचे (आयएसआय) गुप्तहेर पाकिस्तानच्या हाय कमिशनमध्ये काम करत माहिती मिळवत होते. रविवारी काही महत्वाच्या दस्तऐवजांची देवघेव करताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्या अटकेमुळे पाकिस्तानच्या 'स्पाय ट्रॅप'ची पोलखोल झाली आहे. आयएसआयचे हे अधिकारी लष्करातील अधिकाऱ्यांना भेटत आणि 'न्यूज'साठी माहिती घेत आहोत, असे सांगत. माहिती मिळताच आयएसआयपर्यंत पोहोचवत होते. कश्मीरपासून लष्करापर्यंतचे सीक्रेट्स मिळविण्याचा पाकिस्तानचा डाव आहे.
POK : पाकिस्तानने चीनच्या सोबतीने उचलले मोठे पाऊल; भारताची डोकेदुखी वाढण्याची शक्यता
संबंधित दोघांनाही आयएसआयची संपूर्ण ट्रेनींग मिळाली होती. आबिद हुसैन (42) आणि ताहीर खान (44) बनावट आधारकार्ड घेऊन फिरत होते. ते ज्या कारमध्ये फीर होते, ती जावेद हुसैन चलवत होता. ते डिफेन्स अधिकाऱ्यांना सातत्याने लालूच दाखवत, तसेच ना-ना बहाने करून त्यांच्याकडून माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत. त्यामुळे ते मिलट्री इंटेलिजेन्सच्या रडारवर होते. दिल्ली पोलिसांच्या मदतीने त्यांना ट्रॅक करायला सुरुवात करण्यात आली होती. हे दोघेही रविवारी करोलबाग येथे अत्यंत महत्वाच्या माहितीसंदर्भात डिफेन्स कर्मचाऱ्याला भेटण्यासाठी गेले होते. त्याच वेळी त्यांना पकडण्यात आले. तसेच त्यांच्याकडून 15 हजार रुपये आणि दोन आयफोनदेखील जप्त करण्यात आले.
"चीनला 'बॅन' करा, उद्योग-धंदे भारतात हलवा"; अमेरिका तयार करत आहे 'मास्टर प्लॅन'
Paytmने व्हायचे पेमेंट -पाकिस्तान हाई कमिशनच्या डिपार्टमेन्ट ऑफ ट्रेडमध्ये सहायक असलेला आबिद हुसैन आयएसआयचा एजन्ट होता. आयएएनएस वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, तो पाकिस्तानातील पंजाबचा रहिवासी आहे. त्याने आपण अमृतसरचे असल्याचे भारताला सांगितले. मोहम्मद ताहीरचे इस्लामाबादशी संबंध आहेत. तसेच तो HCमध्ये अप्पर डिव्हिजन लिपिकदेखील आहे. हे दोघेही दोन वर्षांपासून हाय कमिशनमध्ये होते. त्यांची गाडी चालवणारा जावेदही पाकिस्तानातीलच आहे. हे दोघेही 'न्यूज रिपोर्टर' असल्याचे खोटे सांगून माहिती गोळा करत होते. त्यांना प्रत्येक आर्टिकलसाठी 25 हजार रुपये आणि महागडे गिफ्टदेखील मिळत होते. त्यांना Paytm सारख्या अॅपनेही पैसे मिळत होते.
24 तासांत देश सोडण्याचे आदेश -दोन हेर पकडल्यानतंर पाकिस्तान गडबडला आहे. भारत आपल्या कर्मचाऱ्यांवर हेरगिरीचे खोटे आरोप लावत आहे. तसेच त्यांना टॉर्चर करण्यात येत आहे. असे पाकिस्तानने म्हटले आहे. या हेरांविरोधात ऑफिशियल्स सिक्रेट्स अॅक्टनुसार, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारताने पाकिस्तान हाय कमिशनच्या या दोन्ही कर्मचाऱ्यांना 'पर्सोना नॉन ग्रॅटा' म्हणून घोषित केले असून त्यांना 24 तासांत देश सोडून जाण्यास सांगण्यात आले आहे.
CoronaVirus News: ...तर फक्त स्वप्नच बनून राहणार 'चमत्कारिक' कोरोना व्हॅक्सीन? अतिघाई पडेल महागात