श्रीनगर : दक्षिण काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील लारनू गावात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी तीन अतिरेक्यांना कंठस्नान घातले. त्याच ठिकाणी नंतर झालेल्या स्फोटात सात नागरिक ठार झाले. पोलिसांनी सांगितले की, लारनू गावात एकेठिकाणी अतिरेकी दडून बसले आहेत, अशी माहिती मिळाल्याने सुरक्षा दलांनी त्या भागास पहाटे वेढा घातला. अतिरेक्यांनी शरण येण्याऐवजी गोळीबार सुरू केला. त्यात सुरुवातीस लष्कराचे दोन जवान जखमी झाले. नंतर सैनिकांनी जोरदार प्रतिहल्ला करून लपलेल्या तिन्ही अतिरेक्यांना ठार केले. त्यांची ओळख लगेच पटली नाही. मात्र, त्यापैकी दोघे पाकिस्तानी व एक स्थानिक असावा, असे समजते.कारवाई आटोपून सुरक्षा दले तेथून रवाना होण्याच्या बेतात असताना स्थानिक नागरिकांनी त्याठिकाणी जाण्यासाठी झुंबड केली. वारंवार सांगूनही काही लोक आत गेले. थोड्याच वेळात तेथे जोरदार स्फोट झाला व त्यात पाच नागरिक मरण पावले. कुलगामचे उपायुक्त शमीम अहमद वणी यांनी पाच मृत नागरिकांची नावे उबेद लावे, ताजुमल, इर्शाद पद्देर, ओझेर अहमद आणि मन्सूर अशी दिली. मृत नागरिकांच्या कुटुंबियांना सरकारतर्फे प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली. चकमक सुरू होताच अधिकाऱ्यांनी त्या भागातील मोबाईल इंटरनेट सेवा लगेच बंद केली. शनिवार सायंकाळपासून दक्षिण काश्मीरमध्ये झालेली ही दुसरी चकमक होती. शनिवारी रात्री पुलवाम येथील एका कारवाईत एक अतिरेकी पळून गेला होता, तर एक जवान जखमी झाला होता. >८ दिवसांत १० अतिरेकी ठारगेल्या आठवडाभरात लष्कर व पोलिसांनी केलेल्या कारवाईत प्रमुख कमांडर मन्नान वणी याच्यासह १० अतिरेकी ठार झाले आहेत. याशिवाय आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात अतिरेक्यांमध्ये सामील झालेल्या एका स्थानिक युवकास आणखी एका कारवाईत जिवंत पकडण्यात आले होते.
पाकिस्तानी घुसखोरांचा डाव उधळून लावताना सीमारेषेवर 'तीन जवानांना वीरमरण'
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2018 6:41 PM