शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

भारतीय हद्दीत घुसून पाकिस्तानी घुसखोराची शेतकऱ्याला मारहाण; सीमेपलिकडे नेण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 11:53 AM

पठाणकोटमधील बमियालभगातील खुदाईपुर या गावात हा प्रकार घडला आहे.

पठाणकोट : भारताच्या सीमारेषेवर केवळ दहशतवादीच घुसखोरी करत नाहीत, तर पाकिस्तानी नागरिकही घुसखोरी करून शेतामध्ये काम करणाऱ्या शेतकऱ्यांना मारहाण करत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. महत्वाचे म्हणजे या शेतकऱ्याला पाकिस्तानच्या हद्दीत ओढत नेण्याचाही प्रयत्न झाला आहे. 

पठाणकोटमधील बमियालभगातील खुदाईपुर या गावात हा प्रकार घडला आहे. शेतकरी सुखबीर सिंह लक्खा त्याच्या सीमेलगतच्या शेतात काम करत होता. यावेळी अचानक पाकिस्तानी नागरिक तेथे आला. त्याने सुखबीरना मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच त्यांना ओढत पाकिस्तानच्या हद्दीत नेण्याचा प्रयत्न झाला. यावेळी सुखबीर यांनी आरडाओरडा केल्याने आजुबाजुच्या शेतात काम करणारे शेतकरी त्यांना वाचविण्यासाठी धावले. हे पाहून पाकिस्तानी नागरिक पळून गेला. त्याच्यासोबत अन्य तीन जण शस्त्रांसह होते, असे सांगितले जात आहे. हे सर्वजण पाकिस्तानी रेंजर पोस्टच्या दिशेने गेले. हा धक्कादायक प्रकार पाकिस्तानी रेंजरकडूनच केल्याची शंका उपस्थित केली जात आहे. 

सुखबीर यांनी सांगितले की, ही या क्षेत्रातली पहिली घटना आहे. यानंतर गावकऱ्यांनी पाकिस्तानविरोधी घोषणा दिल्या. सरपंच रणजीत सिंग यांनी सांगितले की, सीमेला लागून असलेल्या शेतात गावकरी काम करतात. यावेळी जवान त्यांच्यासोबत नसतात. यामुळे ही घटना घडली आहे. यावर एएसआई तरसेम लाल यांनी सांगितले की, शेतकऱ्याच्या तक्रारीनुसार चौकशी सुरु आहे. यानंतर हे प्रकरण बीएसएफकडे देण्यात येईल.

 

आंतरराष्ट्रीय सीमेवर सुखबीर जनावरांसाठी चारा आणण्यासाठी गेला होता. सकाळी 10.30 च्या सुमारास पाकिस्तानी व्यक्तीकडून तीन-4 मिनिटे मारहाण करण्यात आली. यानंतर त्याला पाकिस्तानच्या सीमेवर ओढत नेले जात होते. सीमेपलिकडे तीन जण लष्करी गणवेशात बंदूक घेऊन उभे असल्याचे सुखबीरने पाहिले. लोकांना येताना पाहून या व्यक्तीने ढकलत पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केला. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानFarmerशेतकरीterroristदहशतवादी