नवी दिल्ली : गुजरातमधील मिठा बंदरपासून काही सागरी मैल अंतरावर असलेल्या ठिकाणी मासेमारी करणाऱ्या व सात जणांचा समावेश असलेल्या एका भारतीय बोटीवर पाकिस्तान मेरिटाइम सिक्युरिटी एजन्सीच्या (पीएमएसए) सैनिकांनी गोळीबार केला. त्यात ही बोट बुडाली व एक मच्छिमार बेपत्ता आहे. या प्रकरणी भारताने पाकिस्तानकडे तीव्र निषेध नोंदविला आहे. ही घटना १७ जानेवारी रोजी घडली. सुदामा पुरी असे या बोटीचे नाव असून ती बुडतअसताना भारतीय तटरक्षक दलाच्या सैनिकांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून सहा मच्छिमारांचे प्राण वाचवले. या घटनेची चौकशी करावी अशी मागणी भारताने पाकिस्तानकडे केली आहे.
पाकिस्तानी सैनिकांचा भारतीय बोटीवर गोळीबार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 4:19 AM