ऑनलाइन लोकमत -
मीरपूर, दि. 27 - आशिया कप टी 20मध्ये सुरु असलेल्या भारत - पाकिस्तान मॅचमध्ये भारताने पाकिस्तानचा धुव्वा उडवत अवघ्या 83 धावांवर ऑल आऊट केलं आहे. भारताने पाकिस्तान संघाला पुर्ण 20 ओव्हरदेखील खेळायला दिल्या नाहीत. भारताने पाकिस्तान संघाला 17व्या ओव्हरलाच 83 धावांवर ऑल आऊट केलं. पाकिस्तानने भारतासमोर 84 धावांचं आव्हान ठेवलं आहे. पाकिस्तानतर्फे सरफराज अहमदने सर्वात जास्त 25 धावा केल्या. हार्दीक पांड्याने चमकदार कामगिरी करत 8 धावांवर 3 विकेट्स घेतल्या. रवींद्र जाडेजाने 2, युवराज सिंग आणि आशिष नेहराने प्रत्येकी एक-एक विकेट्स घेतल्या.
कर्णधार महेंद्रसिंग धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार धोनीने गोलंदाजीचा निर्णय घेतल्याने काहींनी आश्चर्य व्यक्त केले होते. मात्र सामना सुरु झाल्यानंतर भारतीय संघाने धोनीचा निर्णय़ सार्थ ठरवत आपली गोलंदाजीची झलक दाखवून दिली. भारताने पाकिस्तानचा निम्मा संघ 35 धावांत गारद केला. अनेक दिवसानंतर झालेल्या या भारत - पाकिस्तान सामन्यात भारताने आपल्या गोलंदाजीने पाकिस्तानी टीमचा अक्षरक्ष धुव्वा उडवला.