शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
2
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
3
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
4
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
5
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
6
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
7
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
8
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
9
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
10
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
11
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
12
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
13
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
14
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
15
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
16
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
17
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
18
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
19
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
20
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका

छुप्या युद्धास पाकचे अभय

By admin | Published: January 14, 2015 2:09 AM

दहशतवादामुळे आपल्याच लोकांचे बळी जात असूनही, पाकिस्तान जम्मू-काश्मिरातील छुप्या युद्धाला अभय देत असल्याचा आरोप लष्करप्रमुख जनरल दलबीरसिंग सुहाग यांनी केला आहे

नवी दिल्ली : दहशतवादामुळे आपल्याच लोकांचे बळी जात असूनही, पाकिस्तान जम्मू-काश्मिरातील छुप्या युद्धाला अभय देत असल्याचा आरोप लष्करप्रमुख जनरल दलबीरसिंग सुहाग यांनी केला आहे. सीमेवर सतत सुरू असलेला गोळीबार आणि घुसखोरीच्या घटनांबाबत त्यांनी धोक्याचा इशारा दिला़मंगळवारी वार्षिक पत्रपरिषदेत बोलताना, त्यांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावले़ गत महिन्यात पाकच्या पेशावरमधील एका लष्करी शाळेवर अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात अनेक निष्पाप मुलांचा मृत्यू झाला होता़ या हल्ल्याचा उल्लेख करीत लष्करप्रमुख म्हणाले की, या हल्ल्यानंतर पाकिस्तानी लष्कराचे मन बदलले की नाही, याची प्रतीक्षा करावी लागेल़ स्वत:च्या नागरिकांचे जीव जात असूनही छुप्या अतिरेकी कारवायांना पाकिस्तान अभय देत आहे़सीमेपलीकडून सुरू असलेल्या सततच्या गोळीबाराबाबत विचारले असता ते म्हणाले की, सीमेवरील कडक पहाऱ्यामुळे अतिरेक्यांना भारतात घुसखोरी करणे अशक्य झाले आहे़ नियंत्रण रेषेऐवजी आता आंतरराष्ट्रीय सीमेवर शस्त्रसंधीचा भंग सुरू आहे़ नियंत्रण रेषेवरील आपला कडक पहारा आणि घुसखोरीविरोधी व्यूहरचनेमुळे कदाचित यामुळे घुसखोरांनी आपला मोर्चा आंतरराष्ट्रीय सीमेकडे वळवला असावा़ आंतरराष्ट्रीय सीमेवरील खुली गटारे आणि नाल्यामुळे घुसखोरांना मदत मिळते़ मात्र भारतीय लष्कर घुसखोरीची समस्या निपटण्यासाठी पूर्णत: सज्ज आहे़ भारतीय सुरक्षा दलाची प्रशंसा करताना ते म्हणाले की, जम्मू काश्मिरात सन २०१४ दरम्यान सुरक्षा दलाने राज्यात सर्वाधिक संख्येत अतिरेक्यांना निष्क्रिय केले़ ११० अतिरेक्यांपैकी १०४ अतिरेक्यांना सुरक्षा दलाने ठार केले़ गतवर्षी ६५ अतिरेकी ठार झाले होते़ (लोकमत न्यूज नेटवर्क)