लाेकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : देशाच्या संरक्षणामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारी मिग-२१ विमाने कायमस्वरूपी लँड हाेणार आहेत. मिग-२१ विमानांचे ‘स्वाॅर्ड आर्म’ स्क्वाड्रन सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस निवृत्त करण्यात येऊ शकते.
मिग विमानांची सध्या ४ स्क्वाड्रन्स आहेत. त्यात ‘स्वार्ड आर्म’चाही समावेश आहे. ही स्क्वाड्रन जम्मू-काश्मीरमध्ये तैनात आहे. सप्टेंबरच्या अखेरपर्यंत हे स्क्वाड्रन निवृत्त झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर तीन स्क्वाड्रनही निवृत्त करण्यात येतील. २०१९ मध्ये बालाकाेट एअर स्ट्राईकनंतर पाकिस्ताच्या अत्याधुनिक एफ-१६ या विमानाला पाडण्यात आले हाेते. हा कारनामा विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांनी केला हाेता. ते याच ‘स्वार्ड आर्म’ स्क्वाड्रनचे सदस्य हाेते तसेच मिग विमानतूनच त्यांनी पाकिस्तानचे विमान पाडले हाेते. आता ही विमाने लवकरच कायमस्वरुपी लँड हाेणार आहेत. या विमानांना २०२५ पर्यंत निवृत्त करण्यात येणार आहे.
‘या’ युद्धांमध्ये निर्णायक भूमिकाnपाकिस्तानसाेबत १९७१ मध्ये झालेल्या युद्धात मिग-२१ विमानांची भूमिका खूप माेलाची हाेती. nत्यानंतर १९९९ मध्ये कारगिल युद्धात या विमानांसह मिग-२७ विमानांनी पुन्हा पाकिस्तानी सैन्याची व दहशतवाद्यांची दाणादाण उडविली हाेती.
विमाने ‘उडते ताबूत’ नावाने कुख्यातसंरक्षण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या ६० वर्षांमध्ये ४०० हून अधिक मिग-२१ विमाने अपघातग्रस्त झाली. त्यात १७० हून अधिक वैमानिक शहीद झाले आहेत. माेठ्या प्रमाणावर वैमानिकांचा मृत्यू झाल्यामुळे या विमानांना ‘उडते ताबूत’ म्हटले जाते.
१९६३ पासून भारतीय हवाई क्षेत्राची सुरक्षामिग विमानांना १९६३ मध्ये भारतीय हवाई दलामध्ये समाविष्ट करण्यात आले हाेते. चीनकडून १९६२ च्या युद्धात पराभव झाल्यानंतर भारताने मिग-२१ विमाने खरेदी केली हाेती. गेल्या ६० वर्षांपासून भारताचे हवाई क्षेत्र मजबूत करण्यात या विमानांची फार माेठी भूमिका राहिली आहे. ‘मिकाेयन-गुरेविच २१’ असे या विमानांचे नाव असून साेव्हिएत रशियाने ते बनविले हाेते. १६ जून १९५५ राेजी हे विमान सर्वप्रथम आकाशात झेपावले हाेते. तेव्हा या विमानाला एकच इंजिन हाेते. २००६ मध्ये विमानांचे अपग्रेडेशन करण्यात आले.