शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
2
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
3
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
4
Baba Siddique : ऑपरेशन बाबा सिद्दिकी डिकोड: App ने कॉन्टॅक्ट, जेलमधून शूटर्सचा इंटरव्ह्यू...; 'असा' रचला कट
5
T20I Record : टीम इंडियानं वर्ष गाजवलं अन् पाकिस्तानच्या संघानं 'लाजवलं'
6
पाकिस्तानात हाहा:कार! नऊ दहशतवाद्यांचा खात्मा, सात सुरक्षारक्षक ठार, सात पोलीस 'किडनॅप'
7
वंचितचे कळमनुरी मतदारसंघातील उमेदवार डॉ. दिलीप मस्के यांच्यावर हल्ला
8
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
9
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
10
नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा
11
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
12
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
13
मराठी-हिंदी गाणी गाणाऱ्या प्रसिद्ध गायकाने गमावलेला आवाज, २ वर्षांनी केला खुलासा
14
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
15
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
16
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
17
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
18
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
19
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
20
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video

पाकिस्तानचे पुन्हा हात वर!

By admin | Published: August 07, 2015 1:54 AM

उधमपूर येथे बुधवारी पकडण्यात आलेला लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी नावेद उर्फ उस्मान हा पाक नागरिक असल्याचा भारताचा दावा पाकिस्तानने फेटाळला असून,

इस्लामाबाद/ नवी दिल्ली : उधमपूर येथे बुधवारी पकडण्यात आलेला लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी नावेद उर्फ उस्मान हा पाक नागरिक असल्याचा भारताचा दावा पाकिस्तानने फेटाळला असून, भारताने पाकवर आरोप करताना संयम पाळावा असेही म्हटले आहे. भारताने पाकिस्तानचे हे म्हणणे अमान्य करीत मुंबईवरील २६/११च्या हल्ल्यात पकडलेला मोहम्मद अजमल कसाब हाही आमचा नागरिक नाही, असे म्हणणाऱ्या पाकिस्तानला नंतर ते मान्य करावे लागले होते, याचे स्मरण दिले आहे. दरम्यान, पाकमधील आघाडीची इंग्रजी दैनिके ‘डॉन’ व ‘द नेशन’ यांनी मात्र आपल्या बातम्यांमध्ये नावेद हा पाकिस्तानीच असल्याचा स्पष्ट उल्लेख केला आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते सय्यद काझी खलिलुल्ला यांनी यासंदर्भाततील टिपणी केली आहे. आम्ही प्रसारमाध्यमातील बातम्या पाहिल्या आहेत. त्यावर मी काही बोलणार नाही. भारतीय अधिकाऱ्यांनी पाकवर कोणताही आरोप करताना, त्याबरोबर पुरावेही सादर करावेत अशी आमची मागणी आहे. भारतात कोणतीही घटना घडली की तत्काळ पाकिस्तानवर आरोप केला जातो, हे अयोग्य आहे. भारताने आरोप करताना पुरावेही द्यावेत; तरच वस्तुस्थितीवर आरोप खरे ठरतील, असे खलिलुल्ला यांनी सांगितले. पाकिस्तानचे म्हणणे असे की, आमच्याकडे नागरिकांची नोंद ‘नॅशनल डेटाबेस’मध्ये आहे व त्यात नावेदचे नाव नाही. परंतु भारत सरकार म्हणते की, पाकिस्तानची लोकसंख्या १८ कोटी अहे व डेटाबेस जेमतेम ९ कोटी नागरिकांचा आहे. त्यामुळे त्याआधारे केलेला दावा अजिबात विश्वासार्ह नाही. उधमपूर हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर प्रस्तावित भारत-पाक राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची बैठक रद्द करा, अशी मागणी सेनेने गुरुवारी लोकसभेत केली. पाकसोबत कोणतीही चर्चा केली जाऊ नये. २३-२४ आॅगस्ट रोजी होणारी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार स्तरावरील बैठकही रद्द करावी, असे खासदार चंद्रकांत खैरे यांनी म्हटले. पाकिस्तानने भारतात अतिरेकी पाठविणे थांबवावे तसेच अलीकडील गुरुदासपूर हल्ल्याबाबत तपासात मदत केल्याखेरीज या देशांसोबत कुठल्याही स्तरावर द्विपक्षीय चर्चा केली जाऊ नये, असे ते गृहमंत्र्यांना उद्देशून म्हणाले. दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी सुरक्षा दलांसोबतच्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाचा तालीब हुसैन नामक संशयित अतिरेकी ठार झाला.पुन्हा अतिरेकी हल्ला : जम्मू-काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यात अतिरेक्यांनी गुरुवारी रात्री पुन्हा पोलीस चौकीवर हल्ला चढवला. यात २ विशेष पोलीस अधिकारी जखमी झाले. कालच येथे झालेल्या हल्ल्याच्या वेळी पाक अतिरेक्याला जिवंत पकडण्यात आले होते. रात्री उशिरापर्यंत चकमक सुरूच होती. आपण पाठविलेला दहशतवादी काश्मीरमध्ये जिवंत पकडला गेला व मुंबईवरील हल्ला पाकिस्तानच्याच भूमीतून केला गेल्याच्या माजी तपास प्रमुखाच्या कबुलीने पितळ उघडे पडले तरी पाकिस्तानच्या वतीने भारतात दहशतवाद पसरविणाऱ्या आयएसआयची खुमखुमी अजून जिरलेली नाही. पाकच्या या गुप्तहेर संघटनेचे माजी प्रमुख जनर हमीद गुल यांनी आता अणुबॉम्ब टाकून दिल्ली व मुंबई बेचिराख करण्याची दर्पोक्ती केली आहे. कोण नरेंद्र मोदी, आमच्यासमोर तो कोणी नाही, आमच्याकडे सर्व साधने आहेत, योजना, तंत्रज्ञान तयार आहे. आम्ही भारताचे तुकडे-तुकडे करू शकतो आणि करून दाखवू, असे त्याने म्हटले.(वृत्तसंस्था)