ऑनलाइन लोकमत
जम्मू, दि. 30 - भारताकडून मिळत असलेल्या चोख प्रत्युत्तरानंतरही नियंत्रण रेषेवरील पाकिस्तानची कुरापतखोरी सुरूच आहे. आज पहाटे जम्मूतील सांबा विभागात पाकिस्तानने पुन्हा गोळीबार केला. त्यानंतर बीएसएफनेही त्याला चोख प्रत्युत्तर दिले.
बीएसएफने शनिवारी पाकिस्तानच्या चार चौक्या उद्ध्वस्त केल्या होत्या. त्यानंतर रात्री दोनच्या सुमारास पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबारास सुरुवात झाली. जम्मूमधील आरएस पुरा विभागात पाकिस्तानच्या लष्कराने पहाटे 3 वाजेपर्यंत गोळीबार केला. तर जम्मूमधील हिरानगर आणि सांबा विभागात रात्री दोन वाजल्यापासून पाकिस्तानी सैनिकांकडून जोरदार गोळीबार करण्यात आला. हा गोळीबार सकाळी सहा वाजेपर्यंत सुरू होता.
भारतीय लष्कराने २९ सप्टेंबरला केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर दोन्ही देशांच्या सीमेवर तणाव निर्माण झाला आहे. सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तानने ५० हून अधिक वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. यात जवानांसह ६ ते ७ भारतीय मृत्युमुखी पडले आहेत. तथापि, भारताने प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात पाकिस्तानचे अनेक सैनिक ठार झाले आहेत.
At 2 AM today Pak started firing in Hiranagar & Samba which continue till 0600 AM intermittently. No loss of BSF or civilians reported.— ANI (@ANI_news) October 30, 2016