चंदीगड : शिखांचे अत्यंत पवित्र तीर्थस्थळ कर्तारपूर साहिब गुरुद्वारा जिथे आहे त्या पाकिस्तानातील पंजाब प्रांतातल्या नरोवाल जिल्ह्यात दहशतवादी प्रशिक्षण तळ उघडण्यात आल्याची खात्रीलायक माहिती भारतीय गुप्तचर संस्थांना मिळाली आहे. गुरुनानक यांच्या ५५० व्या जयंतीनिमित्त भारतातून कर्तारपूरला जाणाऱ्या शीख भाविकांशी संपर्क साधून त्यांचा खलिस्ताननिर्मितीच्या चळवळीला पाठिंबा मिळविण्याकरिता फुटीरतावाद्यांचे प्रयत्न सुरू आहेत.
भारताच्या पंजाब राज्यातील गुरुदासपूर जिल्ह्यातल्या डेरा बाबा नानक साहिब गुरुद्वारा ते कर्तारपूर साहिब गुरुद्वारापर्यंत दोन्ही देशांनी बांधलेला कॉरिडॉर लवकरच शीख भाविकांसाठी खुला होणार आहे. पाकिस्तानच्या पंजाबमधील मुरिडके, शकरगढ, नरोवाल येथील तळांमध्ये अनेक पुरुष व महिलांना दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण देण्यात येत असल्याची भारतीय गुप्तचर यंत्रणांची माहितीआहे.पंजाबच्या सीमावर्ती भागातील सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी भारतीय सुरक्षा यंत्रणांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची नुकतीच एक बैठक झाली. त्यामध्ये पाकिस्तानच्या पंजाबमधील दहशतवादी प्रशिक्षण तळांबद्दल माहिती देण्यात आली. (वृत्तसंस्था)मोबाईल रेंजमुळे चिंतापाकिस्तानमधील मोबाईलची रेंज भारतीय हद्दीत सीमेपासून तीन ते चार कि.मी. आतपर्यंतही मिळू शकते. अमली पदार्थांची भारतात तस्करी करणारे व देशद्रोही कारवाया करणारे लोक पाकिस्तानी सीमकार्ड वापरत असल्याचेही आढळून आले आहे.च्पाकिस्तानी सीमकार्ड वापरण्यास राजस्थानमधील श्रीगंगानगरच्या जिल्हाधिकाºयांनी अलीकडेच बंदी घातली आहे.च्तशाच प्रकारचा निर्णय पंजाबच्या सीमावर्ती भागासाठी घेण्यात यावा अशी सूचना सुरक्षा यंत्रणांनी पंजाब पोलिसांना केली आहे.च्शिखांच्या हक्कांसाठी कथित लढा देणाºया गटांकडून डिजिटल मीडियाद्वारे चाललेला अपप्रचार व विदेशातून होणाºया कारवायांना पायबंद घालण्याचे आव्हानही सुरक्षा यंत्रणांसमोर आहे.