नवी दिल्ली : कुख्यात गुंड व 1993 च्या मुंबई साखळी स्फोटांचा सूत्रधार दाऊद इब्राहिम पाक-अफगाण सीमेवरील वजिरीस्तान येथे लपून बसला आहे; पण पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआय त्याला तेथून हलविण्याच्या विचारात असून, दाऊदसाठी सुरक्षित स्थळ शोधण्याची कसरत चालू आहे. थायलंड, नैरोबी, अरब अमिरात वा बांगलादेश या ठिकाणी दाऊदला हलविण्याचा प्रयत्न यापूर्वीच झाला आहे; पण त्यात यश मिळालेले नाही. अरब अमिरातीत हलविण्याचा निर्णय ऐनवेळी बदलण्यात आला. बांगलादेशचे भारताशी चांगले संबंध असल्याने तेही नाव बाद झाले. आयएसआय तसेच लष्कराच्या अधिका:यांवर दाऊदच्या सुरक्षेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. भारताचे गृहमंत्री राजनाथसिंह यांनी भारतातील दहशतवाद स्थानिक पातळीवर विकसित झालेला नसून, शेजारच्या देशाचे त्याला समर्थन आहे, असे म्हटले आहे.