चेन्नई : सत्ताधारी अण्णाद्रमुकच्या सरचिटणीस व्ही. के. शशिकला यांनी पक्षावरील पकड घट्ट ठेवत तुरुंगात जाण्यापूर्वी मुख्यमंत्री म्हणून निवडलेल्या एडापद्दी के. पलाणीस्वामी यांच्या सरकारने तामिळनाडू विधानसभेत रणकंदनानंतर शनिवारी विश्वासदर्शक ठराव जिंकला.सभागृहाचे कामकाज सुरू होताच विश्वासदर्शक ठरावावर आज मतदान घेऊ नये व घ्यायचेच असेल तर गुप्त मतदान घ्यावे, अशी मागणी द्रमुक व काँग्रेसच्या सदस्यांनी केली. ती फेटाळली गेल्यावर जोरदार गोंधळ व हाणामारी झाली. द्रमुकच्या आमदारांना बाहेर काढल्यावर काँग्रेसचे आठ व मुस्लीम लीगचा एकमेव आमदारही उठून बाहेर गेला. अशा प्रकारे विरोधी पक्षांपैकी कोणीही नसताना फक्त अण्णाद्रमुकचे आमदार शिल्लक उरले. त्यापैकी १२२ आमदार पलानीस्वामी यांच्या बाजूने तर बंडाचे निशाण उभारलेल्या ओ. पनीरसेल्वम यांच्यासोबत ते धरून फक्त ११ आमदार असल्याचे चित्र मतदानानंतर दिसले. विधानसभेची एकूण सदस्यसंख्या २३४ आहे. त्यापैकी १३४ आमदार सत्ताधारी अण्णाद्रमुकचे आहेत. (वृत्तसंस्था)विरोधात फक्त ११ मते पडलीगोंधळ घातल्याने द्रमुक या प्रमुख विरोधी पक्षांच्या आमदारांना बखोट्याला धरून सभागृहाबाहेर काढल्यानंतर आणि काँग्रेसने बहिष्कार टाकल्यानंतर घेण्यात आलेल्या मतदानात पलाणीस्वामी सरकारच्या बाजूने १२२ तर विरोधात फक्त ११ मते पडल्याचे विधानसभा अध्यक्षांनी जाहीर केले.अभूतपूर्व गोंधळ, हाणामारी : सभागृहाला जणू युद्धभूमीचे स्वरूप आले होते. द्रमुकच्या आमदारांनी विधानसभा अध्यक्ष पी. धनपाल यांना धक्के दिले. त्यांना घेरावही घालण्यात आला. गोंधळी आमदारांना अध्यक्षांनी सभागृहाबाहेर काढण्याचा आदेश दिला तेव्हा द्रमुक नेते एम.के. स्टॅलिन यांनी आम्ही सारे आत्महत्या करू अशी धमकी दिली.
पलाणीस्वामी जिंकले!
By admin | Published: February 19, 2017 2:02 AM