शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
2
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
3
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
4
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
5
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
6
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
7
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
8
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश
9
Video - "तुमच्याकडे ऐकून घेण्याची क्षमता नाही"; वर्षा उसगांवकरांविरोधात धनंजयने ठोकला शड्डू
10
पन्नू प्रकरणात अमेरिकेचे भारत सरकारला समन; आता परराष्ट्र मंत्रालयाने दिले जोरदार प्रत्युत्तर...
11
ऋषभ पंतनं लगावला गुंतवणुकीचा 'षटकार', एकाच कंपनीत लावले ₹7.40 कोटी; क्रिकेटच्या भाषेत समजावलं गणित 
12
सलमान खानच्या वडिलांना धमकी देणाऱ्या तरुणीसह दोघांना अटक
13
कॅनडामध्ये शिकायला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी! सरकारचा मोठा निर्णय
14
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर
15
अश्विननं स्लॉग स्वीप सिक्सरसह शाकिबला दाखवलं आस्मान; ते पाहून चाहतेही झाले आवाक् (VIDEO)
16
“भ्रष्ट मार्गाने आलेले खोके सरकार घालवून राज्यात मविआचा मुख्यमंत्री होणार”: बाळासाहेब थोरात
17
Narendra Modi : "ते आपल्या देवी-देवतांना 'देव' मानत नाहीत...", पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर घणाघात
18
आता मनोज जरांगे यांचा भाऊही आंदोलन करणार, मुख्यमंत्र्यांना भेटून दिला इशारा
19
‘लाडकी बहीण’पेक्षा कांद्याला भाव द्या, भाजपा-काँग्रेसला उखडून फेकायचे दिवस आलेत: बच्चू कडू
20
"धर्माच्या नावाखाली गरिबांच्या पोरांचा बळी देऊ नका", निवृत्ती महाराजांचं कळकळीचं आवाहन, कीर्तन चर्चेत

भारतात पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ निदर्शने, लोक रस्त्यावर उतरले; PM मोदींकडे केली 'ही' मागणी...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2023 10:03 PM

Palestine Support in India: बंगळुरू, लखनौ, कोलकातासह अनेक शहरांमध्ये पॅलेस्टाईनच्या पाठिंब्यासाठी लोक रस्त्यावर उतरले.

Palestine Support in India: इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाचे पडसाद इतर देशातही उमटत आहेत. इस्रायलचा दावा आहे की, 80 देश त्यांच्या समर्थनात उभे आहेत तर अनेक देश पॅलेस्टाईनला पाठिंबा देत आहेत. विशेष म्हणजे, भारतातील अनेक शहरांमध्ये पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आणि इस्रायलच्या विरोधात शुक्रवारी निदर्शने झाली.

कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये लोकांनी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आवाज उठवला. बंगळुरूच्या जामिया मशिदीचे इमाम मौलाना मकसूद इम्रान म्हणाले की, इस्रायली सैन्य पॅलेस्टाईनच्या मुस्लिमांवर अत्याचार करत आहे. ज्यू, मुस्लिमांना जबरदस्तीने त्यांच्या भागातून हाकलून लावत आहेत.  इस्रायली लष्कराने अल अक्सा मशिदीमध्ये नमाजपठण करण्यावर बंदी घातली आहे. पॅलेस्टाईनमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी त्यांनी प्रार्थना केली. 

जमशेदपूरमध्येही पॅलेस्टाईनचे समर्थनझारखंडच्या जमशेदपूरमध्येही मुस्लिम समुदाय पॅलेस्टाईनला पाठिंबा देत आहे. जमशेदपूरच्या आंबा आझाद नगरमध्ये शुक्रवारच्या नमाजानंतर मुस्लिम समाजाच्या वतीने पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ निदर्शने करत इस्रायलविरोधात नाराजी व्यक्त केली.

लखनौमध्ये पॅलेस्टिनींसाठी नमाज अदा उत्तर प्रदेशातील लखनऊमध्येही पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ निदर्शने करण्यात आली. लखनौच्या आसिफी मशिदीत शुक्रवारच्या नमाजानंतर 'डाऊन विथ इस्त्रायल' आणि 'डाऊन विथ अमेरिका' अशा घोषणा देण्यात आल्या. येथे पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आणि इस्रायलच्या विरोधात प्रार्थना करण्यात आल्या. शिया धर्मगुरू मौलाना कल्बे नवाद यांनी पंतप्रधान मोदींना आवाहन केले की, ते एक शक्तिशाली पंतप्रधान आहेत आणि त्यांनी हे युद्ध थांबवण्यासाठी पुढे यावे. पॅलेस्टाईनच्या लोकांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी काम केले पाहिजे.

बिहारच्या किशनगंजमध्येही तरुणाई रस्त्यावर बिहारच्या किशनगंजमध्येही शुक्रवारच्या नमाजानंतर तरुण रस्त्यावर उतरले आणि पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. या आंदोलनात काही अल्पवयीन मुलांनीही सहभाग घेतला. किशनगंजच्या मुख्य बाजारपेठेत हे आंदोलन झाले, ज्यामध्ये पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली. कोलकात्यातही अल्पसंख्याक युवा मंचाचे सदस्य पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ निदर्शने करत आहेत. यावेळी आंदोलक पॅलेस्टाईनच्या स्वातंत्र्यासाठी बॅनर घेऊन निदर्शने करण्यात आली. भारताने या मुद्द्यावर नि:पक्षपाती भूमिका घ्यावी, असे संघटनेचे म्हणणे आहे. 

तिरुअनंतपुरम आणि बडगाममध्येही पॅलेस्टाईनसाठी निदर्शनेसोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (SDPI) च्या सदस्यांनी केरळमधील तिरुवनंतपुरममध्ये पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ निदर्शने केली. जम्मू-काश्मीरमधील बडगाममध्ये इस्रायलने पॅलेस्टाईनवर केलेल्या हल्ल्याचा शिया मुस्लिमांनी निषेध केला. यावेळी इस्रायलच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

टॅग्स :Israel-Hamas warइस्रायल - हमास युद्धIsrael Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षIndiaभारतwarयुद्ध