पान 9- पणजीत 6 डिसेंबर रोजी सहकार संमेलन
By admin | Published: September 04, 2015 10:45 PM
मंत्री महादेव नाईक यांची पत्रकार परिषदेत माहिती
मंत्री महादेव नाईक यांची पत्रकार परिषदेत माहितीपणजी : गोव्यात पहिल्यांदाच सहकार संमेलन दि. 6 डिसेंबर 2015 रोजी बांबोळी येथील श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम येथे आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती सहकार व उद्योगमंत्री महादेव नाईक यांनी दिली. पर्वरी येथील सचिवालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी सहकार संमेलनाच्या आयोजन समितीचे अध्यक्ष प्रभाकर वेर्णेकर, सदस्य कांता पाटणेकर व इतर सदस्य उपस्थित होते. नाईक म्हणाले की, या संमेलनात केंद्रीय सहकारमंत्री राधामोहन सिंग, संरक्षणमंत्री मनोहर र्पीकर, मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, आयुषमंत्री र्शीपाद नाईक उपस्थित असतील. गोव्यात 3095 सहकार सोसायटी कार्यरत आहेत. संमेलनात सहकार क्षेत्रातल्या कर्मचार्यांच्या कामाची नोंद घेण्याचा उद्देश असल्याचे नाईक यांनी सांगितले. या संमेलनाच्या आयोजनासाठी आयोजन समिती स्थापन केली आहे. ही समिती राज्यातील नागरिकांकडे संपर्क साधणार आहे. तसेच सहकार क्षेत्र पुढे नेण्यासाठी व क्षेत्रातील समस्या दूर करण्याचा विचार या संमेलनात केला जाणार असल्याचे नाईक यांनी सांगितले. प्रभाकर वेर्णेकर म्हणाले की, या संमेलनात सहकार क्षेत्रातील आव्हानांबाबत चर्चा केली जाईल. तसेच पुढच्या दहा वर्षांसाठी ‘रोड मॅप’ तयार करण्यासाठी व सहकार क्रेडिट सोसायटीला तंत्रज्ञानाबाबत येणार्या समस्यांवर विचारविनिमय केला जाईल.या संमेलनात राज्यभरातून 5 ते 6 हजार सहकार क्षेत्रातील कार्यकर्ते सहभागी होणार असल्याची माहिती कांता पाटणेकर यांनी दिली. (प्रतिनिधी)