हातातली सर्व महत्वाची कामं आधी बाजूला ठेवून 31 मार्चपूर्वी पॅन आणि आधार लिंक करुन घ्या. कारण ते अतिशय महत्वाचं काम आहे. नाहीतर मोठ्या अडचणींचा सामाना तुम्हाला करावा लागू शकतो. आधार-पॅन लिंक तुम्ही स्वत:ही करू शकता. यासाठीची ३१ मार्च ही अंतिम मुदत आहे. त्यानंतर मुदत वाढवली जाणार नाही. तुम्ही असं न केल्यास, पुढील महिन्यापासून किंवा पुढील आर्थिक वर्षापासून अधिकचा TDS भरण्यास तयार रहा.
आधार-पॅन लिंकची मुदत सरकारने आधीच वाढवली आहे. त्यामुळे लिंक करण्याची तारीख आणखी वाढवली जाईल या आशेवर अजिबात राहू नका. ३१ मार्च ही अंतिम मुदत आहे, पण तुम्ही हे काम आजच पूर्ण करा. पॅन आणि आधार लिंक नसल्यास केवळ टीडीएसचे नुकसान होणार नाही. तर तुम्हाला विविध बँकिंग गैरसोयींचा सामना करावा लागेल. डेबिट आणि क्रेडिट कार्डच्या पेमेंटमध्ये समस्या, ऑनलाइन व्यवहारात अडचण येऊ शकते. एटीएममधून पैसे काढतानाही त्रास होऊ शकतो.
आयकर कायदा 139AA नुसार, ज्या लोकांनी 1 जुलै 2017 पर्यंत पॅन बनवले आहे आणि त्यांच्याकडे आधार आहे, त्यांनी ही दोन कागदपत्रे लिंक करावीत. गेल्या तीन वर्षांच्या रेकॉर्डवर नजर टाकली तर सीबीडीटीने आधार आणि पॅन लिंक करण्याची तारीख अनेक वेळा वाढवली आहे. जर निर्धारित तारखेपर्यंत पॅन आणि आधार लिंक केले नाही तर पॅन निरुपयोगी होईल, असंही आयकर कायद्यात नमूद करण्यात आलं आहे. आर्थिक कामात त्याची कोणतीही भूमिका राहणार नाही. अशा परिस्थितीत तुम्हाला अनेक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. जे नवीन पॅनसाठी अर्ज करत आहेत, त्यांनीही त्यासोबत आधार क्रमांक देखील नमूद केला पाहिजे, असंही आयकर कायद्यात सांगण्यात आलं आहे.
लिंक न केल्यास काय होईल?जर PAN आधारशी लिंक नसेल, तर PAN अकार्यक्षम होईल आणि आयकर विभाग असे गृहीत धरेल की तुम्ही PAN सबमिट केला नाही. तुम्हाला मोठा दंड भरावा लागू शकतो. आयकर कलम 206AA(6) नुसार, करपात्र उत्पन्न मिळवणाऱ्या करदात्यांना त्यांचे पॅन कार्ड तपशील द्यावे लागतील. जर करदात्याने दिलेला पॅन अवैध असेल, तर आयकर कलम 206AA(6) नुसार त्याने आपला पॅन क्रमांक कपात करणाऱ्याला दिलेला नाही असं मानले जाईल.
जर तुम्ही ३१ मार्चची अंतिम मुदत चुकवली आणि आधार कार्ड लिंक न केल्यामुळे तुमचे पॅन कार्ड बंद झाले, तर तुम्हाला आयकर कलम २०६एए नुसार सर्वाधिक २० टक्के दराने टीडीएस भरावा लागेल. सध्या टीडीएसच्या अधीन असलेल्या मुदत ठेवी, लाभांश आणि इतर उत्पन्नावरील व्याजावर टीडीएसचा उच्च दर लागू होईल.
10 हजार रुपये दंड भरावा लागेलआयकर कायद्याच्या कलम 272B नुसार, पॅन न दिल्यास 10,000 रुपयांचा दंड होऊ शकतो. तरतुदींनुसार, जेव्हाही कर संबंधित कामात पॅन दिलेला नाही, तेव्हा दंड आकारला जाऊ शकतो. प्रत्येक वेळी एखादी व्यक्ती पॅन कार्ड तपशील प्रदान करण्यात अयशस्वी झाल्यास, डिफॉल्टरवर 10,000 रुपयांचा दंड देखील ठोठावला जाऊ शकतो. हा दंड इतर शुल्कांव्यतिरिक्त असेल, जसे की उच्च टीडीएस दर ज्यासह तुम्हाला दंडाची रक्कम भरावी लागेल.