शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
2
"...म्हणून भाजपाचा मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदेंनी रस्ता मोकळा करावा"
3
"राज ठाकरे यांना फसवलं, इव्हीएममुळेच महायुती जिंकली’’, मनसेचा गंभीर आरोप
4
Jacqueline Fernandez : "तिला काहीच..."; सुकेशकडून महागड्या भेटवस्तू घेणाऱ्या जॅकलिन फर्नांडिसच्या वकिलांचा युक्तिवाद
5
IRCTC ची ब्लॅक फ्रायडे ऑफर, स्वस्तात मिळेल फ्लाइट तिकीट आणि 'ही' सुविधा...
6
"बाप आखिर बाप होता है", मुलगी पराभूत झाल्यानंतर विजयी पित्याचे बॅनर चर्चेत!
7
 स्वबळावर बहुमताजवळ, तरीही मुख्यमंत्रिपदावर अडलंय घोडं, भाजपासमोर आहेत या अडचणी
8
ऐश्वर्या रायबाबत भावजयचीही क्रिप्टिक कमेंट, अभिनेत्रीसोबत कधीच फोटो शेअर करत नाही; कारण...
9
Maharashtra Politics: महाराष्ट्रात बिहार मॉडेल लागू होणार नाही; भाजपच्या नेत्याने आतली बातमी सांगितली; मुख्यमंत्रिपदावर सस्पेन्स कायम
10
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
11
जगातील टॉप ५० हायराईज टॉवरपैकी एकात आहे Rohit Sharmaचं घर; किंमत, वैशिट्ये पाहून अवाक् व्हाल
12
Hit and Run Video: अहिल्यानगरमध्ये कारचालकाने चौघांना चिरडले, घटना सीसीटीव्हीत कैद 
13
Fact Check : बॉलिवूड अभिनेते असरानी यांचा भाजपावर टीका करणारा 'तो' Video दिशाभूल करणारा
14
'सन ऑफ सरदार' फेम दिग्दर्शकाच्या १८ वर्षीय मुलाचं भीषण अपघातात निधन
15
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
16
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
17
Guru Pradosh 2024: कर्जमुक्त आयुष्यासाठी करा गुरु प्रदोष व्रत; दाखवा दही भाताचा नैवेद्य!
18
Rahul Gandhi : राहुल गांधींनी अदानींच्या अटकेची केली मागणी; विरोधकांच्या गदारोळानंतर लोकसभा तहकूब
19
Infosys Employee Bonus : इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; कंपनीनं केली ८५ टक्के बोनस देण्याची घोषणा
20
Sonia Meena IAS: माफियांनाही फुटतो घाम, सुनीता मीणांना का म्हणतात दबंग अधिकारी?

पणजी निवडणूक (फुर्तादोंचा फोटो घेणे)

By admin | Published: January 31, 2015 12:34 AM

केवळ दोन वर्षे द्या : फुर्तादो

केवळ दोन वर्षे द्या : फुर्तादो
- स्वच्छ चारित्र्य, निस्वार्थ काम हीच शिदोरी
पणजी : पर्रीकरांना २0 वर्षे दिली, आपल्याला केवळ दोन वर्षे द्या आणि कसोटीला उतरलो नाही तर पुन: निवडून आणू नका, अशी हाक कॉँग्रेसचे उमेदवार सुरेंद्र फुर्तादो यांनी पणजीवासियांना दिली आहे.
काँग्रेसची दशा झालेली असताना या पक्षाच्या तिकिटावर रिंगणात उतरण्याचे धाडस तुम्ही कसे काय केले, असा प्रश्न केला असता ते म्हणाले की, आपण काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. धर्मनिरपेक्षतेला मी प्राधान्य देतो. काँग्रेसच्या मंत्री, आमदारांनी किंवा अन्य नेत्यांनी भूतकाळात काय केले याची पर्वा मला नाही. माझे स्वच्छ चारित्र्य पणजीवासीयच नव्हे, तर गोमंतकीय जाणून आहेत. काँग्रेस आता नव्या चेहर्‍यांना संधी देत असून पक्षाला निश्चितच चांगले दिवस येणार आहेत.
या निवडणुकीत तुमची जमेची बाजू कोणती, असे विचारता फुर्तादो म्हणाले की, महापालिकेत आपण केलेले काम सर्वश्रूत आहे. जवाहरलाल नेहरू शहर पुननिर्माण योजनेखाली केंद्राकडून ९0 कोटी, सांतइनेज नाल्यासाठी १९ कोटी, इ-गव्हर्नन्ससाठी २0 कोटी रुपये आणले. गेली २५ वर्षे महापालिकेत निस्वार्थपणे केलेल्या कामाबद्दल शहरवासियांना जाणीव आहे. चारित्र्य स्वच्छ राखून कोणतीही अपेक्षा न बाळगता काम केलेले आहे. सीएसआरखाली कंपन्यांकडून पुरस्कृत करून १0 ट्रक, १ शववाहिका मनपासाठी आणली. गवत कापण्याची १५ यंत्रे, १५ एसी, १२ प्रुनर्स आणले. मनपाच्या सभागृहाची रंगरंगोटी करून घेतली.
काँग्रेसच्या तिकिटावर तुम्ही रिंगणात आहात; परंतु पक्षाचे आमदार किंवा नेते प्रचारात सोबत दिसत नाहीत, याचे कारण काय? बाहेरून प्रचारासाठी कोणी आलेले तुम्हाला नकोय, अशीही चर्चा आहे. खरे काय? असा प्रश्न केला असता ते म्हणाले की, आपण कोणाही काँग्रेसी आमदार किंवा नेत्याला येऊ नका, असे सांगितलेले नाही. उलट प्रत्येक आमदाराकडे आता बूथ वाटून दिलेले असून पक्षाचे आमदार आणि पदाधिकारी निश्चितपणे आपल्यासाठी वावरतील. येत्या काही दिवसांत ते प्रत्यक्ष फिल्डवरही दिसतील.
समाजकार्यकर्ते आयरिश रॉड्रिग्स यांनी तुम्हाला पाठिंबा जाहीर केला आहे. अजून कोणी समर्थन देण्यासाठी पुढे आले आहेत का, असे विचारता काहीजण उघडपणे बोलत नाहीत; परंतु छुपा पाठिंबा देत आहेत. चाौैकट.... कॅसिनोविषयी भूमिका स्पष्ट
जाहीरनाम्यात कॅसिनांेचा उल्लेख नाही. कॅसिनोंबद्दल तुमची नेमकी भूमिका काय, असा प्रश्न केला असता महापौर म्हणून वेळोवेळी मी याबाबतीत माझी भूमिका स्पष्ट केलेली आहे, असे त्यांनी सांगितले. कॅसिनो भाजपच्या पाठिंब्यावर सार्दिनचे सरकार सत्तेवर असताना त्यांनी आणले. आम्ही आमची भूमिका सुरुवातीपासून स्पष्ट केली आहे, असे फुर्तादो म्हणाले; परंतु या प्रश्नावर अधिक काही बोलण्याचे त्यांनी टाळले. (प्रतिनिधी)