ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, १८- पनामा पेपर लीक प्रकरण बिग बी म्हणजे अमिताभ बच्चन यांना चांगलंच भोवलं आहे. अमिताभ बच्चन यांना अतुल्य भारतचा ब्रँड अँबेसेडर बनवण्याचा निर्णय केंद्रीय सांस्कृतिक मंत्र्यांनी रद्द केला आहे. एएनआयनं दिलेल्या वृत्तानुसार, जोपर्यंत अमिताभ यांना क्लीन चिट मिळत नाही, तोपर्यंत त्यांना अँबेसेडर पदावर राहता येणार नसल्याचं केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयानं सांगितलं आहे. पनामा पेपर लीक झाल्यानं जगभरात खळबळ उडाली होती. भारतातून अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय-बच्चन यांची नावं समोर आली होती. मोदी सरकारनं पनामा पेपर लिकमध्ये बच्चन यांचं नाव आल्यानं आता सावध पवित्रा घेतला आहे. आता फक्त प्रियंका चोप्रा अतुल्य भारतची ब्रँड अँबेसेडर असणार आहे. पनामा पेपर लिकमध्ये मोठ्या प्रमाणात भारतीयांची नावं असल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे. केंद्रीय मंत्रालयानं याप्रकरणी समिती नेमली आहे. अमिताभ बच्चन निर्दोष आढळल्यास त्यांच्या नावाचा पुनर्विचार केला जाईल, असंही केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयानं म्हटलं आहे.
Decision was supposed to be taken this month, decision will only be taken after clean chit is given to Amitabh Bachchan: Govt Sources— ANI (@ANI_news) April 18, 2016
Decision of signing Amitabh Bachchan as Brand Ambassador of 'Atulya Bharat' delayed due to his name appearing in #PanamaPapers: Govt Sources— ANI (@ANI_news) April 18, 2016