शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: अनेक मतदारसंघांमध्ये उलथापालथ; या क्षणाला कोणी घेतली आघाडी? सर्व अपडेट्स
2
बीडमधून मोठी अपडेट; परळी विधानसभेत धनंजय मुंडे पहिल्या फेरीत आघाडीवर!
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : ३५ मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी थेट लढत; कोण मारणार बाजी?
4
माहीममधून मोठी बातमी! अमित ठाकरेंची आघाडी, सदा सरवणकर पिछाडीवर
5
Maharashtra Assembly Election 2024 Result Dahisar Vidhansabha : दहिसरमधून भाजपच्या मनीषा चौधरी आघाडीवर, तिसऱ्यांदा उतरल्यात मैदानात; उबाठाचे विनोद घोसाळकर पिछाडीवर
6
Maharashtra Assembly Election Result 2024: पहिल्या १३० जागांचे कल हाती, महायुती आणि मविआत काटे की टक्कर, भाजपा वरचढ
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
8
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
10
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
12
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
13
...तर आम्हालाही आत्मरक्षणाचा अधिकार; मणिपूरचे मंत्री मैतेई यांनी दिला इशारा
14
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
15
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
16
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
17
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
18
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
19
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी

Panama Papers Leak: ऐश्वर्या रॉयची ED च्या कार्यालयात तब्बल 5 तास चौकशी, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2021 9:37 PM

ऐश्वर्या राय बच्चनला यापूर्वीही दोन वेळा बोलावण्यात आले होते. मात्र दोन्ही वेळा तिने नोटीस स्थगित करण्याची विनंती केली होती. पनामा पेपर्स लीकची चौकशी करणाऱ्या विशेष तपास पथकासमोर तिने ही विनंती केली होती.

पनामा पेपर्स लीक (Panama Papers Leak) प्रकरणी ऐश्वर्या राय बच्चनला (Aishwarya Rai Bachchan) समन्स बजावण्यात आले होते. तिला अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) चौकशीसाठी बोलावले होते, यानंतर ऐश्वर्या चौकशीत सहभागी होण्यासाठी ईडीच्या दिल्ली कार्यालयात पोहोचली. येथे ऐश्वर्याची साडेपाच तास चौकशी करण्यात आली. याप्रकरणी ईडीने नुकतीच अभिषेक बच्चनलाही समन्स बजावले होते.

ऐश्वर्या राय बच्चनला यापूर्वीही दोन वेळा बोलावण्यात आले होते. मात्र दोन्ही वेळा तिने नोटीस स्थगित करण्याची विनंती केली होती. पनामा पेपर्स लीकची चौकशी करणाऱ्या विशेष तपास पथकासमोर तिने ही विनंती केली होती.

फेमाप्रकरणी ईडीने ऐश्वर्याला समन्स बजावले होते. हे समन्स 9 नोव्हेंबर रोजी 'प्रतिक्षा' म्हणजेच बच्चन कुटुंबीयांच्या निवासस्थानी पाठवण्यात आले होते. यावर १५ दिवसांत उत्तर मागितले होते. ऐश्वर्याने ईमेलद्वारे ईडीला उत्तरही दिले होते. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीमध्ये ईडी, आयकर विभाग आणि इतर एजन्सींचाही समावेश आहे.

नेमकं काय आहे पनामा पेपर लीक प्रकरण?पनामा पेपर्स लीक प्रकरणात एका कंपनीचे (Mossack Fonseca) लिगल दस्तऐवज लीक झाले होते. हा डेटा जर्मन वृत्तपत्र Suddeutsche Zeitung (SZ) ने 3 एप्रिल 2016 रोजी Panama Papers या नावाने प्रसिद्ध केला होता. यात भारतासह 200 देशांतील राजकारणी, उद्योगपती, सेलिब्रिटींची नावे होती आणि त्यांच्यावर मनी लाँड्रिंगचा आरोप होता. यात 1977 ते 2015 अखेरपर्यंतची माहिती देण्यात आली होती. या यादीत 300 भारतीयांची नावे होती. यात ऐश्वर्याशिवाय अमिताभ बच्चन, अजय देवगण तसेच पळपुट्या विजय माल्याच्या नावाचाही समावेश होता. 

टॅग्स :Aishwarya Rai Bachchanऐश्वर्या राय बच्चनEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयdelhiदिल्लीbollywoodबॉलिवूड