कोल्हापूर : संत गाडगे महाराज सेवा संस्था आणि सुबराव गवळी तालीम मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पंचगंगा नदी घाटावर स्वच्छता मोहीम राबविली. तसेच स्मशानभूमीला एक हजार शेणी दान देण्यात आल्या. यावेळी पंचगंगा नदीतीरावर निर्माल्य अर्पण करण्यासाठी पालिकेच्यावतीने जलकुंड बांधण्यात यावेत, अशी मागणी संत श्री गाडगे महाराज सांस्कृतिक सेवा संस्थेचे अध्यक्ष प्रकाश रांगणेकर यांनी केली आहे. पंचगंगा नदी घाटावर स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार असल्याने नागरिकांना सहभागाचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मंगळवारी सकाळी राबविलेल्या या स्वच्छता मोहिमेतून सुमारे चार ट्रॉली कचरा पंचगंगा नदीपात्रातून काढण्यात आला. या मोहिमेनंतर स्मशानभूमीला प्रकाश रांगणेकर यांच्या हस्ते एक हजार शेणी दान केल्या. या उपक्रमात महापालिकेतील भाजप आघाडीचे गटनेते विजयराव सूर्यवंशी, विरोधी पक्षनेते संभाजी जाधव, माजी नगरसेवक विजय साळोखे (सरदार), तसेच बबन माने, आण्णा पेडणेकर, रवी पोवार, सुनील रसाळ, संतोष माळी, तानाजी मोरे, विशाल माने, दशरथ घाटगे, आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)श्री संत गाडगे महाराज सेवा संघ आणि सुबराव गवळी तालीम मंडळातर्फे पंचगंगा नदीपात्रातील कचरा काढून परिसरात स्वच्छता मोहीम राबविली. यात नगरसेवक विजय सूर्यवंशी, संभाजी जाधव, माजी नगरसेवक विजय साळोखे, प्रकाश रांगणेकर, बबन माने, बायासाहेब बुरटे, आदी सहभागी झाले होते.
तरुणांकडून पंचगंगेची स्वच्छता
By admin | Published: May 30, 2016 12:18 AM