"नेहरू म्हणाले होते, आरक्षणवाल्यांनी नोकरी मिळवली, तर सरकारी सेवांची क्वालिटी...!"; PM मोदींचा मोठा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2024 08:23 PM2024-09-14T20:23:33+5:302024-09-14T20:23:58+5:30
"लक्षात असू द्या, नेहरू जेव्हा पंतप्रधान होते तेव्हा त्यांनी आरक्षणाला विरोध केला होता. राज्यांतील मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते, पुरावे उपलब्ध आहेत. एवढेच नाही, तर नेहरू असेही म्हणाले होते की, आरक्षण असलेल्यांनी नोकरी मिळवली तर, सरकारी सेवांची क्वालिटी खराब होईल. हे नेहरूंचे शब्द आहेत."
भारतात सर्वात मोठे दलित विरोधी, ओबीसी विरोधी आणि आदिवासी विरोधी, जर कुणी असेल तर, ते काँग्रेस कुटुंब आहे. एवढेच नाही तर, आरक्षण असलेल्यांनी नोकरी मिळवली तर, सरकारी सेवांची क्वालिटी खराब होईल, असे नेहरू म्हणाले होते. हे नेहरूंचे शब्द आहेत, असा दावा करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर थेट हल्ला चढवला आहे. ते हरियाणातील कुरुक्षेत्र येथे भाजपच्या प्रचारसभेत बोलत होते.
आरक्षण असलेल्यांनी नोकरी मिळवली तर... -
मोदी म्हणाले, "भारतात सर्वात मोठे दलित विरोधी, ओबीसी विरोधी, आदिवासी विरोधी, जर कुणी असेल तर, ते काँग्रेस कुटुंब आहे. आता या लोकांनी म्हटले आहे की, सरकारमध्ये आल्यास, दलित आणि मागास समाजाचे आरक्षण रद्द करणार. हेच या कुटुंबाचे सत्य आहे. काँग्रेसचे कुटुंब पहिल्यापासूनच बाबासाहेब आंबेडकरांचा द्वेष करत होते. आरक्षणाला घोर विरोध करत आले आहे. या कुटुंबाने नेहमीच दलीत, ओबीसी आणि आदिवासी समाजाचा अपमान केला आहे. लक्षात असू द्या, नेहरू जेव्हा पंतप्रधान होते तेव्हा त्यांनी आरक्षणाला विरोध केला होता. राज्यांतील मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते, पुरावे उपलब्ध आहेत. एवढेच नाही, तर नेहरू असेही म्हणाले होते की, आरक्षण असलेल्यांनी नोकरी मिळवली तर, सरकारी सेवांची क्वालिटी खराब होईल. हे नेहरूंचे शब्द आहेत."
ओबीसी आरक्षण, पंडित नेहरू अन् इंदिरा गांधींचा उल्लेख -
ओबीसी आरक्षणासंदर्भात बोलताना मोदी म्हणाले, "ओबीसी आरक्षणासाठी ज्या काकासाहेब कालेलकर आयोगाची स्थापना झाली होती, त्याचा जो अहवाल आला होता, तो ओबीसी समाजाचे भाग्य बदलणारा होता. मात्र पंडित नेहरूंनी तो थंड बासनात टाकला. नेहरूंनंतर इंदिरा गांधी आल्या, त्यांनीही ओबीसी आरक्षण आडवून ठेवले. जेव्हा देशाने त्यांना शिक्षा केली, जनता पक्षाचे सरकार आले, मोरांजी भाईंच्या नेतृत्वात मंडल आयगाची स्थापना झाली. मत्र नंतर पुन्हा काँग्रेस आली, त्यांनी मंडल आयोगाचा अहवालही थंड बासनात टाकला..."
... तेव्हा मंडल आयोगाचा अहवाल लागू झाला -
...यानंतर राजीव गांधींनीही आपल्या सरकारच्या काळात ओबीसींना आरक्षण मिळू दिले नाही. जेव्हा केंद्रात भाजपच्या समर्थनाने व्हीपीसिंहांचे सरकार बनले, तेव्हा मंडल आयोगाचा अहवाल लागू झाला. (व्हीपीसिंहांचे सरकार आले होते, अटलजींच्या जनसंघाने/भाजपने समर्थन केले होते.) तेव्हा कुठे ओबीसी समाजाला आरक्षण मिळाले. जेव्हा भाजपचे समर्थन होते," असेही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितले.